मुखपृष्ठ
काळी

माझे शेल्फ

काळी

इंग्रजी शीर्षक
Kali
सारांश

पर्ल बक यांच्या ‘द गुड अर्थ’ या जगप्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद म्हणजेच भारती पांडे यांनी अनुवादित केलेली काळी ही कादंबरी होय. ज्या व्यक्तीला वाचता येते तिने हे पुस्तक वाचून स्वत:मध्ये मुरवून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये असे धडे घेण्याचीवेळ केव्हा ना केव्हा आलेली असते, असा अभिप्राय या कादंबरीबद्दल मास-मार्केट-पेपर बॅकमध्ये नोंदविण्यात आलेला आहे. वालंगलुंग आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवन प्रवासामध्ये सहभागी होऊन जाता यावे, अशा प्रकारचे संवादी लेखन या कादंबरीचे आहे. वांगलुंग हा चिनी शेतकरी या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या लग्नाच्या दिवसापासून या कादंबरीला सुरुवात होते आणि या जीवन प्रवासात प्रौढ झालेली त्याची सुशिक्षित आणि शहरी मुले त्याच्या मरणाची वाट पाहतात. इथे ही कादंबरी संपते. अत्यंत विलक्षण असे हे कथानक वांगलुंगच्या जीवनाकडे आपल्याला भावव्याकुळतेने पाहयाला लावते गत जीवनाकडे अतिशय तटस्थपणे पाहणारा वांगलुंग हा संपूर्ण जगात असणाऱ्या शेतकऱ्याचा प्रतिनिधिक नायक वाटतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद