मुखपृष्ठ
कांद्याचा वांधा

माझे शेल्फ

कांद्याचा वांधा

इंग्रजी शीर्षक
Kandyacha Vandha
सारांश

माणसाच्या आयुष्यातील रसिकता, विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क, नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद म्हणजे ‘कांद्याचा वांधा या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते, शहाणं करून सोडते.

वास्तव व कल्पित यांच्यातील सीमारेषा रुंदावल्या की व्यक्तिरेखेतील प्राणच निघून जातो. हे त्याने सोदाहरण स्पष्ट करतात. ‘गोदीच्या किनाऱ्यावर’ मध्ये लेखक १९४२ चे मंतरलेले दिवस वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याने एक क्रांतिकारी वळण घेतले होते. महात्मा गांधी, पं.नेहरू, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, आचार्य कृपलानी, स्वा.सावरकर, अच्युतराव पटवर्धन, इंदिरा गांधी अशा नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अपार कष्ट उपसले त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, गांधी हत्येनंतरचा भारत, जनसामान्यांची मानसिकता, सामाजिक समस्या, उपेक्षितांची दैन्यावस्था यांचे विश्लेषण केले आहे. भाई मनोहर कोतवालांचे ‘पाम व्ह्यू’ तील दिवस, कामगारांसाठी केलेला संघर्ष, लढा, त्यांना मिळवून दिलेला न्याय या त्यांच्या महत्त्वपूर्ण जीवनकार्याचा गुणगौरव लेखकाने विस्तृतपणे केला आहे. इतिहासातील प्रसिद्ध, पराक्रमी, गुणी, मुत्सद्दी व्यक्तींच्या आयुष्यातही वादग्रस्त घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन झाकोळून जाऊ शकते. त्या व्यक्तिमत्त्वात एक स्खलनशील माणूस सामावलेला असतो. या सत्यावर प्रकाश टाकताना लेखकाने बाजीराव-मस्तानी यांच्यातील हळुवार नातेसबंध व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या जीवनातील समान प्रसंगाचा आधार घेतला. राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, आदर्श राजा हे समान गुण असूनही एका मोहास बळी पडल्याने एका व्यक्तिरेखेचे पतन होते. प्रस्तुत पुस्तकातील अनुभवांचे कांचनकण हृदयात अमोल ठेवा म्हणून साठवून ठेवावेत असे लेखकाच्या खास वैशिष्ट्यांसह हे कांचनकण झळाळून उठतात. कोणत्याही व्यक्तीतील, कलाकृतीतील दिव्यत्वाचा, अलौकिकत्वाचा शोध घेण्याचा लेखकाचा हव्यास या ललित लेखांतून दिसतो. त्यांच्या भावस्पर्शी, हळुवार पण सखोल चिंतनाचा स्पर्श असलेल्या या ललित लेखांचा आस्वाद घेताना हे मनात दरवळत राहते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद