मुखपृष्ठ
कॅट ओ नाईन टेल्स

माझे शेल्फ

कॅट ओ नाईन टेल्स

इंग्रजी शीर्षक
Cat O Nine Tales
सारांश

जेफ्री आर्चर...आपल्या लेखनाने स्वत:च एक ब्रॅण्ड झालेला हा इंग्लिश लेखक. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ या पहिल्याच कादंबरीने त्यांना प्रकाशझोतात आणलं. तब्बल १७ देशांमध्ये त्यांची ही कादंबरी विकली गेली. लेखक, अभिनेता, नाटककार, राजकारणी अशी जेफ्री यंची ओळख असली, तरी फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगलाय. कंपनीत गुंतवलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केलं आणि पहिल्याच फटक्यात ते जगभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनाही एखाद्या पिक्चरप्रमाणे रोमांचकारी आहेत. आयुष्याच्या चढउतारावर भेटलेल्या अनेक प्रसंगांचा अनुभव त्यांच्या लेखणीतून व्यक्त होतो... स्टोरी नरेट करण्याची जेफ्री यांची स्वत:ची आहे. त्यांची कादंबरी एकदा हातात घेतली, की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटत नाही. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ प्रिझन डायरीज, फर्स्ट अमंग इक्वल्स अशा अनेक कादंबऱ्या हे याचं उदाहरण. इंग्रजीमधील त्यांचं दर्जेदार आणि इण्टरेस्टिंग साहित्य आता मराठीतही येतंय. ‘कॅट ओ’नाईन टेल्स’ हा त्यांचा पाचवा कथासंग्रह मेहतांनी मराठीत आणलाय. एकूण १२ कथांचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. दोन वर्षांच्या तुरुंगवासात आर्चर पाच वेगवेगळ्या तुरुंगात राहिले. या दरम्यान त्यांना भेटलेल्या व्यक्तींच्या या कथा आहेत. स्वत:च्या मालकाचे पोस्ट ऑफिस लुटणारं जोडपं, पत्नीच्या खुनाचं कारस्थान रचणारा माणूस, टॅक्स चुकवण्यासाठी निरनिराळ्या कल्पना लढवणारा हॉटेलिअर, घटस्फोटानंतर प्रॉपर्टीची मागणारी लोभी पत्नी अशा अनेक एकाहून एक सुरस कथा यात आहेत. रंगतदार अशा या कथा वाचता-वाचता आपण नकळत त्यात गुंततो. कथा पुढे काय वळण घेणार, याची अपार उत्सुकता लागते. कथा संपत आल्यावर शेवट ‘प्रेडिक्ट’ करणार तेवढ्यात अनपेक्षित असतो, तेवढाच धक्कादायकाही. त्यामुळेच कथा वाचण्याची ही गंमत अनुभवायला हवी. आर्चर यांची कथा सांगण्याची ओघवती शैली मराठीतही जपण्याची काळजी लीना सोहोनी यांनी घेतली आहे. सोपी आणि ओघवती भाषा, रंगतदार कथा आणि अनपेक्षित असा शेवट यामुळे पुस्तक खरंच इण्टरेस्टिंग होतं. एकदा तरी वाचून त्या अनुभवायला हवं.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
218
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद