माझे शेल्फ
क्लाराज वॉर
क्लाराज वॉर" हे सुद्धा anne frank च्या पठडीतले वाचकाच्या काळजाला हात घालणारे पुस्तक युद्धस्य कथा रम्य: च्या दुसऱ्या बाजूचे प्रत्ययकारी चित्रण करुन देणारे आवर्जून वाचावे असे....
``आपल्या प्रिय व्यक्ती आपल्यापासून हिरावून मृत्यूच्या दाढेत फेकल्या जातात आणि तरीही आपण जगतच राहतो.`` २१ जुलै १९४२ रोजी नाझी सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं आणि झोक्लीव या छोट्या गावातल्या पंधरा वर्षीय ज्यू मुलीचं, क्लारा क्रेमरचं आयुष्य बदलून गेलं. तिचे मित्र-नातेवाईक ठार केले जात असताना किंवा आगखान्यात जळून खाक होण्यासाठी नेले जात असताना, क्लारा नि तिचे कुटुंबीय एका तळघरात लपून जीव वाचवण्यासाठी झगडले. तेदेखील कुठं तर वरकरणी ज्यूद्वेष्टा वाटणाऱ्या बेक नावाच्या जर्मन माणसाच्या घराखाली.साठ वर्षांनंतर आता क्लारा क्रेमर तिची करुण कहाणी सांगते आहे. सतत मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या क्लाराच्या या विलक्षण आठवणींमध्ये क्रौर्य, भीषण हत्याकांडे आणि नाझींच्या सैतानी प्रवृत्तीची छाया हे सगळं असलं, तरी अखेर ही कहाणी आहे एका तरुण मुलीच्या दुर्दम्य आशावादाची आणि धैर्याची.
त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खास लक्षात राहते. साध्या प्रसंगांमधून नाट्य खुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. हे करताना आपण काहीतरी महत्त्वाचं सांगतोय, असा त्यांचा आव नाहीय. साध्यासोप्या शैलीत सहज कथनातून पुढे जाणारी गोष्ट वाचकाला खिळवून ठेवते. उल्का राऊतांनी मूल कादंबरीची मजा अनुवादात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही वेळा शब्दश: केलेलं भाषांतर वाचनाची मजा खिळखिळी करतं. कादंबरीची सुरुवात होते ते वाक्य असं आहे... ‘ऑगस्ट महिना संध्याकाळ झाली तरीही भरपूर उकडत होतं.डोनाल्डचं वर्णन करताना ‘उंच, देखणा आरि राजबिंडा, फिक्या तपकिरी रंगाचे, काहीसे तेलकट केस मागे विंचरलेले असा डोनाल्ड शर्टच्या बाह्या वर सरसावून पास्र्लीची भली मोठी जुडी साफ करत होता.’ ...असं लांबलचक वाक्य येतं. पण अशी उदाहरणं अपवादानेच दिसतात. स्थलांतरित भारतीय वंशाच्या मानसिकतेतून उमटलेली, जगभर गाजलेली एक ‘बेस्टसेलर’ मराठीमध्ये आणण्याचं श्रेय उल्का राऊतांना जातं हे मात्र निश्चित!