मुखपृष्ठ
कोल्ड स्टील

माझे शेल्फ

कोल्ड स्टील

इंग्रजी शीर्षक
Cold Steel
सारांश

भारतीय वंशाच्या ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने म्हणजेच लक्ष्मी मित्तल यांनी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या उद्योगसमूहातील औद्योगिक वर्चस्वासाठी लढाई केली. ही लढाई त्यांनी जिंकलीही. या लढाईचे धगधगते चित्रण ‘कोल्ड स्टील’ या पुस्तकात आपणास वाचावास मिळते. २००६ मध्ये सर्वात जास्त पोलादाचे उत्पादन करणारे उद्योजक बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी एकमेकाला भिडले. त्यातून महासंग्राम सुरू झाला आणि या दोन नेत्यांभोवती यातील कथानक फिरत राहिले. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत आणि जागतिक पातळीवर पहिल्या पाचात असणारे लक्ष्मी मित्तल स्वकर्तृत्वाने उद्योगक्षेत्रात दादा माणूस झाले. राजस्थानमध्ये आजोबांनी बांधलेल्या घरात चपलेशिवाय चालणारा आणि साध्या बाजेवर झोपणारा लक्ष्मी मित्तल आज पोलादाच्या साम्राज्यात आपला अमिट ठसा उमटवणारा मोठा उद्योजक झाला. यशस्वितेच्या क्षितिजांना स्पर्श करत असताना मित्तल विरुद्ध आर्सेलर या संघर्षाने जगातील सर्व उद्योजकांचे लक्ष वेधले. आपली कंपनी सर्वश्रेष्ठ असली पाहिजे. ही महत्त्वाकांक्षा मित्तल यांची होती. या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी आर्सेलरवर दावा सांगणाऱ्या गी डोलला फोन करून आर्सेलरची बोली आपण बोलणार असल्याचे सांगितले. यातून सुरू झालेला संघर्ष वाचत असताना जगातील महान व्यक्तीचे जीवन संघर्षातून कसे तावून-सुलाखून निघते हे पदोपदी जाणवत राहते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद