मुखपृष्ठ
कॉलनी

माझे शेल्फ

कॉलनी

सारांश

सिद्धार्थ पारधे या साहित्य सहवासच्या आधाराने वाढलेल्या प्रगल्भता आलेल्या लेखकाचे हे मनोगत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झगडून यश मिळवल्याचीही ही गाथा आहे. निव्वळ माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेला झगडा मनाला चटका लाऊन जातो. वैयक्तीक स्वच्छतेसारख्या गोष्टीही माणसाला मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरात मिळत नाहीत. इतर सामाजिक स्विकार तर दूरचीच गोष्ट आहे. पुस्तकातली अनेक प्रकरणे तत्कालीन समाजाच्या मानसिकतेवरही बोट ठेवतात. मनाला उभारी देणारे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक विपरीत परिस्थितीत प्रेरणा देणारे असू शकेल हे नक्की!

मनोगतात लेखक पारधे म्हणतात, 'ह्या ठिकाणी माझे अनुभव जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न एवढ्याचसाठी आहे की, माझे अनुभव वाचून कदाचित समाजात दडलेला अजून एखादा सिद्धार्थ समाजासमोर यावा एव्हढीच इच्छा.'
पुस्तकाला विंदांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांच्या हस्ताक्षरात मलपृष्ठावर छापल्या आहेत.

-
आपला
गुंडोपंत

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
किंमत
150.00