मुखपृष्ठ
कोमा

माझे शेल्फ

कोमा

इंग्रजी शीर्षक
Coma
सारांश

वैद्यकीय विश्वात खळबळ माजविणारी कादंबरी डॉ. सुसान ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये जॉईन होते . हे अतिशय नावाजलेले हॉस्पिटलमध्ये आहे . पण त्या हॉस्पिटलमध्ये अचानक एका वर्षात सहा पेशंट कोमामध्ये गेले आहेत . एक वीस वर्षीय खेळाडू ुढग्याच्या छोट्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जातो . त्या आधी ही नॅन्सी नावाची तरुणीही असेच छोटे ऑपरेशन चालू असतानाच कोमामध्ये जाते . डॉ सुसान या घटनेच्या मुळाशी जायचे ठरविते . मग तिच्यावर संकटे कोसळू लागतात . तर दोनवेळा प्राणघातक हल्लाही होतो . हॉस्पिटलमधून तिची बदली होते . तरीही न डगमगता ती या प्रकरणाच्या मुळाशी जाते . सत्य समजताच तिला धक्का बसतो पण अजूनही तिला काही धक्के बसणार आहेत .आता तिचा जीवच धोक्यात आहे . ज्या आठ नंबरच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे घडतेय तिथेच तिला ऑपरेशनसाठी नेले जातेय . यातून कोण तिला वाचवेल.डोक्याला मुंग्या आणणारे कथानक, नाट्यपूर्ण मांडणी, उत्तरोत्तर ताणलं जाणारं रहस्य. त्याचा मागोवा घेणारी सुझान. एक भन्नाट वाचनानुभव. जर मी चुकत नसेन तर या कादंबरीवर चित्रपट देखील आला होता.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद