माझे शेल्फ
कॉन-टिकी
‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या तरुण संशोधकाच्या अंगी भिनली होती. थॉर हेयेरडाल या तरुण संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापल्याडचा पोलिनेशिया गाठायचा, हे ठरविले. अर्थातच अनेकांनी त्याला वेड्यात काढले; पण तो ठाम राहिला. कारण त्याच्या सिद्धान्तानुसार कैक हजार वर्षांपूर्वी- अश्मयुगात असेच एका संस्कृतीचे स्थानांतरण झाले होते. मग त्याने अनेक अडथळ्यांवर मात करून, त्या लोकांसारखाच तराफा सिद्ध केला. ही कहाणी, या ‘वेड्या’, अद्भुत वाटाव्या अशा साहसी प्रवासाची... ही कहाणी मानवी संस्कृती, निसर्ग, समुद्री जीवन, जलचर, वादळवारे यांची; मानवी इच्छाशक्तीची, एका शोधाची आणि एका तराफ्याची– ‘कॉन-टिकी’ची!हे लेखन म्हणजे अद्भुत सागरी सफरीचे कथन आहे. थॉर हेयेरडाल या संशोधकाने तराफ्यावरून हजारो सागरी मैलाचा प्रवास करून प्रशांत महासागरापलीकडचा पोलिनेशिया गाठायचा, असे ठरवले. संकटांशी सामना करीत, सर्व अडथळ्यांना पार करीत त्याने ही मोहीम पूर्ण केली. त्या मोहमेचाच हा थरारक वृत्तांत आहे. हा प्रवास म्हणजे कॉन-टिकी सिद्धांत आहे. वारा आणि सागरी प्रवाहांच्या मदतीने ‘फातू हीवा’ नावाच्या सागरी बेटांवर कसे जाऊन पोहोचले याचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी हा प्रवास केला.