माझे शेल्फ

कोर्टशिप

सारांश

तुटणाऱ्या नात्याचे अनोखे पैलू उलगडणारी कादंबरी.

एखादे नाते तोडणे खूप सोपे असते पण त्याच नात्याला नव्याने निर्माण करून कायम ठेवणे कठीण असते. पण नात्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले आणि नात्याला आवश्यक असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या तर तेच नाते नव्याने बहरते.

निषाद आणि अन्वी ची ही प्रेम कहाणी असेच काहीसे शिकवून जाते.

चिद्विलास क्षीरसागर यांनी या कादंबरीच्या माध्यमातून 'घटस्फोट' या विषयावर प्रकाश टाकला आहे. छोट्या छोट्या कारणांवरून पती पत्नीमध्ये होणारे गैरसमज, अवती भवतीच्या नात्यांचे परिणाम आणि त्यामधून घडणारे घटस्फोट हे दोन जणांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारे ठरतात. समाजात अशा गोष्टींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

पण पती पत्नीने लग्नानंतर या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले तर नाती अधिक समृद्ध होतील हा या कादंबरीचा मुख्य हेतू आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी