मुखपृष्ठ
कर्णपिशाच्च

माझे शेल्फ

कर्णपिशाच्च

इंग्रजी शीर्षक
Karnapishachcha
सारांश

डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके हे व्यावसायिक शास्त्रज्ञ आहेत. त्यांची अनेक पुस्तके, शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. ‘चिरंजीव’, ‘उद्याचे वैद्यक’ आणि ‘कॉम्प्युटरच्या करामती’ या पुस्तकांना महाराष्ट शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. त्यांचे ‘कर्णपिशाच्च’ हा गुनहेगारीचा शोध वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कसा घेतला जातो याचा कथासंग्रह. या कथासंग्रहात बारा कथा असून अमृतराव आणि कौशिक ही दुक्कल गुन्हेगारांचा शोध विज्ञानाच्या साहाय्याने घेते. पोलीस आणि वैज्ञानिक एकत्र आले तर काय घडू शकते याचे चित्रण या कथासंग्रहात येते. उत्कंठा ताणून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. त्याचबरोबर कौशिक अमृतरावांची जुंगलबंदीही चांगलीच रंगते. बाळ फोंडके यांचे हे मानसपुत्र केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी व्यक्ती न राहता संवेदनशील व्यक्तिमत्त्वे म्हणून वाचकांच्या जवळ येतात. कर्तव्य आणि माणुसकी याची योग्य ती सांगड विज्ञानाच्या दृष्टिकोन आाणि गुन्हेगारांना शोधण्याची पद्धत या सर्वांमुळे हा कथासंग्रह वाचनीय ठरतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद