मुखपृष्ठ
कर्वालो

माझे शेल्फ

कर्वालो

इंग्रजी शीर्षक
Karvalo
सारांश

सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोेधयात्रेची रोमहर्षक कथा! उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षांच्या वाटचालीत घडलेला एक ‘अपघात’! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख ‘किवी’ कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो! निसर्गरम्य पाश्र्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वैशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती!

किंबहुना तो दहावी नापास होऊन प्रथम जेंव्हा घरी आला आणि आई कशी कडाडली ते सांगत म्हणतात, “ तुम्हाला कशी परिस्थितीची जाणीव नाही रे? जेंव्हा तेंव्हा गोष्टींची पुस्तकं नाकाला लावून बसतोस लाज कशी वाटत नाही? तुमच्यासाठी किती हाडाची काडे करतो आम्ही? अपेशी तोंड दाखवायला आलासच का? त्यापेक्षा तिकडं राहिला असतास, माधुकरी मागून जेवला असतास, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून पास होऊन माझ्यापुढे आला असतास तर तुझा अभिमान वाटला असता...!”... आणि भाऊ घराबाहेर पडला तो काही बनूनच मग पुन्हा समोर आला...! पुढे ४२ च्या लढ्यात व्यंकटेश माडगूळकर सहभागी झालेले. त्यामुळे पुन्हा घरदार सोडून भटकत राहिले. त्यांची आई कायमच चिंता करत राही. आपली मुलं काहीबाही करू लागली आहेत हे पाहून साठीनंतर पुन्हा त्यांचे आईबाप मूळ गावी परतले. तिथेच जुन्या पडक्या वाड्यात राहिले. शिक्षकी पेशा असलेला भाऊ त्यांचं पाहू लागला. मात्र तिथं राहायचं सुख नशिबी नव्हतंच. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच नंतर गांधीजींची हत्या झाली. गावचं घर जाळले गेले. पुन्हा हे सगळे मोठ्या भावाकडे जाऊन राहिले. मात्र वडिलांची जगण्यावरची वासनाच उडाली. भावाने गावातले घर जमेल तसं पुन्हा पत्रे घालून उभं केलं मात्र शेवटी वडील गेलेच. तिथून पुढची तीस वर्षांची वाट आई मग एकटीनेच चालत राहिली. तिची आठ मुलं म्हणजे जणू वेगवेगळ्या समस्या होत्या. कोडी होती. ती आपापल्या परीने सोडवत राहिली. तिचा जावई अकाली गेला. दोन्ही मुली अपघातात गेल्या. एक अन्य मुलगा जो शिकून मोठा झाला त्याला मोठ्या राजकारणामुळे बदनाम केलं गेलं. त्याची निंदा-नालस्ती झाली. कर्तृत्ववान म्हणून नावाजलेला, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला थोरला मुलगाही मोठ्या आजाराने ग्रासला गेला. आईच्या डोळ्यातली झोप यामुळे कशी उडालेली हे वाचताना आपणही ती वेदना जगू लागतो. अचानक आयुष्याच्या शेवटच्या दिवसात “आदर्श माता” म्हणून तिचा जाहीर मोठा सत्कार समारंभ ठरतो. आजवर कुणी तिचा कधी वाढदिवसही साजरा केलेला नसतो. साठी, पंचाहत्तरी वगैरे काही साजरं झालेलं नसते. अशा वेळी हा सत्कार म्हणजे तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा सुवर्णक्षण असतो... मात्र ...... नियती या आईला तो एक सत्कारसुद्धा, त्याचा अपार आनंदही भोगू देत नाही. सोबत भल्या मोठ्या दु:खाचं दान देते. हे वाचताना आपणही उरी तुटत राहतो...! आपल्या आईच्या जीवनाविषयी लिहिताना माडगूळकर म्हणतात, “ तिचा प्रवास हा परिस्थितीच्या वाळवंटातून केलेला जीवन प्रवास होता. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आहे. अचानक आडवे येत मार्ग खुंटवणारी वाळूची टेकाडे आहेत. धुळीची वादळे आहेत. तहान तहान आहे. जराशी हिरवळ आणि पाणी ही आहे... पुष्कळ काहीबाही आहे...” या थोर कुटुंबाची प्रसिध्दी, नावलौकिक आपण पाहिलाय.मात्र सगळ्याला पुरून उरलेलं जे कारुण्य आहे ते मला अंतर्बाह्य व्याकूळ करून टाकतं. डोळ्यांना ओलं व्हायला तेवढं निमित्त पुरेसे असतं...!!

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद