माझे शेल्फ
अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज
जेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज येऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही.
कादंबरीच्या लेखनाविषयी सांगायचं झाल्यास, कोणीतरी म्हंटलंच आहे, "A Brilliant Mind Is Known By Its Ability To Communicate A Complicated Subject Matter In A Simple Manner And Without Losing The Essence." - हीच जेफ्री आर्चर यांच्या लेखन कौशल्यातील प्रशंसनीय बाब आहे. कथानक अर्ध्यातून पुढे किंचित गुंतागुंतीचं असलं तरी, वाचकाला ते सहज समजेल याची विशेष काळजी घेतली आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रसंग, पात्र आणि पानापानांवर येणारे "Twist & Turns" तर इतक्या खुबीने रंगवले आहेत की, वाचतांना ती परिस्थिती प्रत्यक्षात अनुभवत असल्याचा आभास आपल्याला होतो. मुखपृष्ठ व हा अभिप्राय पाहता वाटते तितकी साधं-सरळ ही कहाणी नसून मधल्या मध्ये त्यात प्रचंड मोठ्ठं वळण आहे ! त्या वळणावर विशाल कलाटणी घेत ही कहाणी आपल्याला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाते, आणि सरतेशेवटी तिथेच घेऊन येते, ज्याची प्रतीक्षा डॅनी, व अपेक्षा आपण करत असतो ! हे झालं समिक्षण ! वैयक्तिक मत सांगायचं झाल्यास, लेखक जेफ्री आर्चर यांच्या साहित्यातील मी वाचलेली ही पहिलीच कलाकृती; आणि केवळ या एकाच लेखनाने मी त्यांचा प्रशंसक झालो. या कादंबरीतून मिळालेले सर्व बोध माझ्यासाठी अमूल्य आहेत, मी ते आत्मसात करेन आणि एक गोष्ट तर मी कधीच विसरणार नाही - "ज्यांची नियत साफ असते; त्यांचा पराभव कधीही होत नाही !