माझे शेल्फ
लेट हर फ्लाय
झुंजार व विश्वव्यापक लढा... ‘लेट हर फ्लाय’ पुस्तकात पाकिस्तानातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या छोट्याशा खेड्यातील एका लहान मुलाचा प्रवास मांडला आहे. ज्याने पुढे जगभरात समानता आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. झियाउद्दीन यांनी दहशत आणि आर्थिक दुर्बलता अशा दन्ही पातळ्यांवर परिस्थितीशी झुंजत जगासमोर नवा आदर्श उभा केला. तसेच यापुढे एक पाऊल टाकत त्यांचा लढा वीस वर्षांपासून विश्वव्यापक केला. त्यातूनच ते आजतागायत जगातील सर्व मुलींसाठी लढा देत आहेत. ‘लेट हर फ्लाय’मधील युसूफभाई यांचा प्रवास जगभरातील मुली आणि स्त्रियांसाठी प्रत्येकाने ‘का लढा दिला पाहिजे?’ हा संदेश पोहोचवतो.समानतेच्या लढ्यात आपल्या मुलीच्या जीवाची बाजी लावावी लागली, पण तरीही एका पित्याने हार मानली नाही. पाकिस्तानातल्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या एका मुलाची आणि नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसफजाई हिच्या पित्याची ही कहाणी.