मुखपृष्ठ
लिव्हिंग हिस्टरी

माझे शेल्फ

लिव्हिंग हिस्टरी

इंग्रजी शीर्षक
Living History
सारांश

अॅड. हिलरीची कर्तृत्ववान कहाणी... जगात सामर्थ्यशाली व समृद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाची पत्नी फर्स्ट लेडी ऑफ यू. एस. ए. - हिलरी रॉडहॅम क्लिंटन या जगन्मान्य व जबरदस्त व्यक्तीचे हे तेवढेच जबरदस्त आत्मकथन होय. जगातील ‘पवरफूल लेडिज’ च्या दहा क्रमांकात हिलरी यांचा समावेश झाला, तो केवळ त्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणून नव्हे तर त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रांतल्या प्रचंड कार्यामुळे! थोड्याच अवधीत एक स्त्री इतके प्रचंड कार्य करू शकते. अन् तेही जगभर सतत फिर राहून यावर सकृतदर्शनी विश्वास बसणे कठीण जाते. पण, वाचताना जसजशी पाने पुढे पुढे जाता तसतसे ते निखळ सत्य असल्याचे जाणवते. कारण प्रत्येक प्रसंग व घडलेल्या घटना तारीख वारासह सूक्ष्म तपशीलात दिलेल्या आहेत. आयुष्यातल्या सगळ्याच भूमिका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ‘पारदर्शी आत्मकथनाचा हा एक आदर्श नमुना वाटतो. त्यातून अनुवादिका सुप्रिया वकील यांनी मूळ आशयास मराठीचा सुंदर साज चढविला आहे. पुस्तकाची सुरुवात अमेरिकेच्या पार्श्वभूमीने होऊन त्याच प्रकरणात लेखिका हिलरी रॉडहॅम क्लिंटन हिने आपला जन्म (२६ ऑक्टों. १९४७), जन्मठिकाण, आपली आई, आजी, वडील, त्यांचा व्यवसाय, दुसऱ्या महायुद्धाचा त्यांच्या व्यवसायावर झालेला परिणाम, काका रसेल व त्यांचा झालेला शोकांतिक अंत अशा आपल्या माहेरच्या परिवाराची माहिती दिली आहे. आजीमुळे आपल्या आईचे बालपण किती खडतर गेले हे आठवून आजही त्यांना वाईट वाटते. आजीच्या वर्तणुकीचा एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे. तो वाचून वाचकांनाही वाईट वाटते. एका छोट्या चुकीसाठी त्यांच्या आजीने त्यांच्या आईला (डोरोथी हॉवेल रॉडहॅम) एक वर्षभर एका खोलीत कोंडून ठेवले. या आजीचे वर्णन हिलरी यांनी ‘एक असमाधानी स्त्री... गूढ व्यक्ती’ असे केले आहे. त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. आपल्या आई-वडिलांच्या आईचे-हन्नाह-वर्णन मात्र ‘एक धीट व निश्चयी स्त्री’ असे केले आहे. आईच्या आईने हिलरींना आपले माहेरचेही आडनाव लावण्याचा आग्रह केल्यामुळे त्यांच्या नावापुढे दोन्ही आडनावे आहेत. महायुद्धाच्या आर्थिक मंदीची झळ या कुटुंबाला लागून गरिबीच्या छायेत त्यांना कसे दिवस काढावे लागले, याचेही वर्णन लेखिकेने खूप मोकळेपणाने केले आहे. त्यांच्या कथनाला हा मोकळेपणा कायम शेवटपर्यंत टिकला आहे. आपल्या कुटुंबात झालेल्या अशोभनीय गोष्टी लेखक टाळत असतात, इथे मात्र लेखिकेने संदर्भाच्या ओघात सहजतेने सांगितल्या आहेत.बिल उच्चपदावर असताना बिलच्या रॉजर नावाच्या लहान सावत्र भावास कोकेन-सेवन व विक्री या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा झाली. त्या वेळी आपल्या अधिकाराच्या जोरावर त्याची सुटका करणे बिलला सहज शक्य झाले असते; पण त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘तुम्ही तुमच्या कायदेशीर मार्गाने जा.’ आपल्या पतीची ही कर्तव्यकठोरता पाहून हिलरींना आपल्या पतीचा खूप अभिमान वाटला. आपल्या पतीबद्दल वाटणारा आदर व प्रेम त्यांनी प्रसंगानुसार अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ‘जे घडले ते कथन केले’ या त्यांच्या दृष्टिकोनामुळे त्यांचे आत्मकथन इतके ‘पारदर्शी’ झाले आहे, की इतरत्र ते क्वचितच आढळते. ‘बिल क्लिंटन’ या पाचव्या प्रकरणात त्यांनी क्लिंटन यांच्या परिवाराविषयी सविस्तर सांगितले आहे. बिल यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४६चा. त्याच्या वडिलांचा मृत्यू मे १९४६ मधला. म्हणजे बिलच्या जन्मापूर्वी साडेतीन-चार महिने अगोदर त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या २३ वर्षांच्या विधवा आईने भूलतज्ज्ञ परिचारिकेचे प्रशिक्षण पूर्ण करून त्या स्वयंनिर्भर बनल्या. याच प्रकरणात हिलरी, यांनी बिलशी झालेली पहिली भेट, त्यानंतर प्रेम व विवाह (११ ऑक्टो. १९७५) याविषयी वर्णन केले आहे. या वर्णनात त्यांचा दिलखुलास स्वभाव दिसून येतो. लग्ल अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या दिवाणखान्यात झाले. सन १९८० मध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या म्हणतात, १९८० हे वर्ष आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. कारण त्या वर्षांत आम्हाला मातृपितृपद लाभलं होतं.’ संसाराला सुरुवात झाल्यानंतर जुन्या व स्वस्तातल्या वस्तू जमवून किती काटकसरीने त्यांनी दिवस काढले, याचे वर्णन पान १११ वर आलेले आहे. लग्नानंतर बिल अर्कान्सासला (त्यांचे गाव) युनियन ऑफ अर्कान्सास स्कूल ऑफ लॉ मध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले तर हिलरी या ‘येल’ येथील आपले लॉचे शिक्षण सुरू असतानाच ‘चिल्ड्रेन्स डिफेन्स फंड’ (?.?.?.) येथे काम करू लागल्या. जेव्हा वेलस्ली इथे कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्याच दरम्यान राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्यावर वॉटरगेट प्रकरणी महाभियोग चालवला जाणार होता. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वकिलांच्या यादीत हिलरी यांचेही नाव होते. त्या निवडीने त्या खूप सुखावल्या, तरी मोठ्या जबाबदारीचे ओझेही त्यांना अस्वस्थ करू लागले.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद