मुखपृष्ठ
लज्जा

माझे शेल्फ

लज्जा

इंग्रजी शीर्षक
Lajja
सारांश

धार्मिक कटवटपणावर हल्ला करणारी क्रांतिकारक कादंबरी… ‘लज्जा’ ही सध्या गाजत असलेली तस्लिमा नसरीन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. तस्लिमा या कवी म्हणून बांगलादेशात प्रसिद्ध आहेत. १९८६ साली त्यांचा ‘शिकोरे विपुल खुदा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि प्रतिभाशाली लेखिका म्हणून त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. आतापर्यंत त्यांचे सात कवितासंग्रह तर पाच कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘लज्जा’ ही सहावी कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणाऱ्या हिंदूची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कादंबरीचा आशय खळबळजनक असल्याने तीवर सतत चर्चा होत आहे. केवळ चर्चेवरच हे प्रकरण थांबले नाही तर जातीय सलोखा बिघडत असल्याचा आरोप लेखिकेवर करण्यात आला आणि मूलतत्त्ववादी व जातीयवादी शक्तींच्या भयाने सरकारने या कादंबरीवर बंदी घातली व तस्लिमा नसरीन यांच्यावर टीका करण्यात आली. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. अवघ्या बत्तीस वर्षांच्या या प्रतिभावंत लेखिकेवर मोठी आफतच गुदरली आहे. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बाबरी मशिदीचा विदध्वंस झाला आणि जगातल्या मुसलमानांनी आपला संताप व्यक्त केला, त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेशातील मुसलमानांनी तेथल्या अल्पसंख्याक हिंदूचा अनन्वित छळ केला, त्याचे विदारक सत्य दर्शन या कादंबरीत झाल आहे. माणूस ज्या देशात राहतो तो देश त्याचा असतो, तिथल्या जमिनीवर, निसर्गावर, माणसांवर तो प्रेम करीत असतो. पण देशापेक्षा जेव्हा धर्म श्रेष्ठ मानला जातो, त्यावेळी माणसांच्या देशप्रेमाची व्याख्या बदलली जाते. धर्म आणि जात या बाबी व्यक्तीपुरत्या मर्यादित असतात, शिवाय त्या घरापुरत्या सीमित असतात. पण मनुष्य धार्मिक अधिक असतो याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे डिसेंबर १९९२ मध्ये जगात उसळलेले हिंदू-मुसलमानांचे धार्मिक दंगे, वास्तविक पाहता बाबरी मशीद भारतात, ती भारतातल्या मूलतत्त्ववाद्यांनी नष्ट केली. या प्रकरणाचे पडसाद जगातल्या मुस्लिम देशातही उमटले. कारण नसताना बांगलादेशातील हिंदू मंदिरे उदध्वस्त केली. हिंदूवर अत्याचार केले. भारतातल्या हिंदूनी मुसलमानांच्या अस्मितेवर घाला घातला असा समज करून घेऊन बांगलादेशीय हिंदूवर तिथल्या कर्मठ मुस्लीम माणसांनी हल्ले केले. अनेकांची घरे जाळली, दुकाने फोडली. अनेक वर्षे शेजारीशेजारी राहणाऱ्या हिंदू-मुस्लीम कुटुंबामध्ये नाहक वितुष्ट आणले आणि दोन कुटुंबामधला स्नेहभाव नष्ट होऊन वैरभाव वाढला. दोन समाज एकमेकांविरुद्ध शस्त्रे परजीत उभे ठाकले. या परिस्थितीचे चिंतन या कादंबरीत आहे. अनेकांना अंतर्मूख होऊन विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोजना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. बांगलादेशात उसळलेल्या दंगलीत बरेवाईट होण्याच्या आधीच दुसरीकडे निघून जावे असे मायाला वाटत होते. पण बांगलादेशात घडलेली १९५२ची भाषिक चळवळ, १९५४ची युनायटेड फ्रंटची निवडणूक, १९६२ची शैक्षणिक चळवळ, १९६६ची सहा कलमी चळवळ, आगरताळा कटाविरुद्ध निषेधाचा लढा, १९७१ सालचे बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचे आंदोलन या सर्व राष्ट्रीय चळवळीत सुधामय स्वत: सहभागी झाले होते. हिंदू असूनही मुस्लिमांबरोबर खांद्याला खांदा लावून लढले. राष्ट्राविरोधी शक्तीविरुद्ध आंदोलन केले, ते या राष्ट्रावर त्यांची निष्ठा होती म्हणून. अनेक मुस्लिम माणसांशी, कलाकरांशी, कुटुंबाशी त्यांचे घरोब्याचेच संबंध होते. ‘‘ही आपल्या वाडवडिलांची जमीन आहे, हिचा कधी त्याग नाही करायचा.’’ अशी भूमिका सुधामयची होती, पण नाईलाज झाला म्हणून ज्या मालमत्तेची किंमत दहा लाख टका आली असती ती मालमत्ता व घर त्यांना भयापोटी केवळ दोन लाख टका किंमतीला विकावे लागले होते. घर सोडताना प्रत्येकालाच वेदना होणे साहजिकच होते. ‘‘या धर्मांध लोकांना चाबकानं फोडून काढलं पाहिजे. हे ढोंगी धर्ममार्तंड सगळे तोतया आहेत, धर्मांच्या नावाने भडकावणारे.’’ असा विचार सुरंजनाच्या मनात सतत येत असे. लुन्कर, कैसर, अख्तारुज्जमनसारखे मुसलमान पुरोगामी आणि अल्पसंख्याक हिंदूच्या बाजूचे होते. ते सुरंजन-सुधामयच्या कुटुंबाशी स्नेहाने वागत असत, पण हिंदूंना वाचविणे त्यांनाही शक्य झाले नाही. अनेक वर्षांची मैत्री धार्मिक तेढीमुळे भंग पावली होती. स्वातंत्रप्राप्तीनंतर बांगलादेशाने राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता मान्य केली होती. पण १९७५ नंतर त्या कलमाचे धिंडवडे निघाले होते. शाळांचे मदरसामध्ये रूपांतर झाले होते, रस्त्यांना असलेली हिंदूची नावे बदलून मुस्लिमांची नावे ठेवण्यात आली होती. देशाला आर्थिक आधर राहिला नव्हता. हा असंतोष हिंदूचा द्वेष करण्यास कारणीभूत ठरला.

नवऱ्याशी न भांडता, त्याच्याविरुद्ध एक शब्दही न बोलता सायन्स प्रयोगाच्या वेळी सुचलेल्या एका युक्तीने पार त्याचे अस्तित्वच ती मिटवून टाकते. त्याला पार अपंग बनवून टाकते. मार्गारेटाच्या अक्कल हुशारीने नवऱ्याचा काटा काढण्याचा मार्ग म्हणजे अंतर्यामी वेदनेने व्याकूळ झालेल्या एका शोषित स्त्रीचा अतर्क्य असा सूड आहे. पाचवी मारी कोलान्थू ही पांढरपेशात न मोडणारी घरकामवाली स्त्री आहे, ती त्या कूपेत प्रवेश करताक्षणीच इतर स्त्रियांच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात, त्या फार बोलक्या आहेत. त्या तिच्याही लक्षात आल्याने कोणाशीही न बोलता ती मुकाट्याने वरच्या बर्थवर जाऊन पडते. या वेठबिगार गरीब बाईला अनौरस संततीला जन्म द्यावा लागतो. हिच्या नशिबी कायम दु:ख व कष्ट! ती म्हणजे मागास जमातीतील प्रातिनिधिक स्वरूपाची व्यक्तिरेखा वाटते. सहावी १४ वर्षांची शीला ही शाळकरी पोर असून,जीवनातील चढउतार तिने अनुभवलेले नसल्याने इतरांच्या चर्चेत भाग न घेता चुपचाप पुस्तक वाचत बसते. नुकतीच आजी गेल्याने तशी ती दु:खी असते. जीवनाचे विविध रंग दाखविणारा हा लेडीज कूपे. यातील साऱ्याच स्त्रिया दक्षिणेकडील. त्यामुळे संपूर्ण कादंबरीभर तेच वातावरण आहे. तिकडची सुंदर वर्णने यात आहेत. अपर्णा वेलणकर यांनी या कादंबरीचे केलेले मराठी भाषांतर अप्रतिम आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही वेधक झाले असते, तर ते अधिक आवडले असते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद