माझे शेल्फ
लक्ष्यवेध
लक्ष्यवेध हि अतिशय सुंदर आणि अप्रतीम लिखान कादंबरी हातात घेतली तशी एक दिवसात वाचुन पुर्ण झाली.. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट आणि अफझल खानचा वध.. महाराजांची युध्द नीती आणि बुद्धी चातुर्याची प्रतेक पानावर वाचताना प्रचिती येते.. खान मारल्या शिवाय स्वराज साधता येणार नाही हे राजे पुरते जाणुन होते आणि म्हणून यासाठी महाराजानी राजकारणाचा पट मांडला आणि या दोन राजकारणी धुरन्धरानी खेळलेला डाव म्हणजे लक्षवेध याचे खुप सुंदर वर्णन केलेले आहेत..! शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. या चरित्राइतके सर्वांगसुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. असा या चरित्राचा लौकिक. बारा मावळांत स्वराज्याचे रोपटे रुजते न रुजते, तोच अफझलखानाचे संकट अवतरले. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोडियानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्वोक्ती होती; आणि खानास मारल्याविना राज्य साधणार नाही, हे राजे पुरे जाणून होते. या दोन राजकारणधुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजेच ‘लक्ष्यवेध’.जरुर वाचावे!
आपणा सर्वांना श्रीगणोशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन. हा श्रीगणेशोत्सव आपणा सर्वांना आरोग्यसंपन्नतेचा, आनंद, मनःशांती आणि सुखसमृद्धीचा असो. आपल्या आणि आपल्या सुह्रदांच्या आयुष्यात श्रीगणेशकृपेने निर्विघ्नता, आनंद, सौख्य, समृध्दता, बल, बुध्दी, ज्ञान यांचे स्थान अधिकाधिक बळकट आणि वृध्दिंगत होवो हीच सदिच्छा आणि प्रार्थना.....!!!
सुधामय-किरणयीची वयात आलेली मुलगी मायाला मुस्लीम गुंडांनी पळवून नेले होते. सुरंजनसारखा कलावंत, बुद्धिमान अभ्यासू तरुण मुसलमानांच्या छळवादाने विषप्राशन करण्याचा प्रयत्न करीत होता. जोय बांग्ला, बांग्ला जोय अशी गाणी गाणारे कुटुंब वेडेपिसे झाले होते. एक मशीद तोडल्याचा सूड म्हणून हिंदूची जुनी आणि शिल्पांची नमुने असणारी आलिशान मंदिरे नष्ट केली. धर्म आणि देश या दोन गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबांचा छळ करतात. तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. अनेक हिंदू कुटुंबे भयग्रस्त झालेली दिसत होती. भारतात निघून येण्याची त्यांनी तयारी केली होती. सुधामय कुटुंबाला देश सोडून द्यावा असे वाटत नव्हते. पण परिस्थिती विकोपाला गेली, अनेक मुलींवर अत्याचार झालेले पाहिले, अनेक रूपवान मुलींना देहविक्रय करताना पाहिले, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता. हिंदूंना आणि मुसलमानांनाही लाज आणणारा होता. या अर्थाने ‘लज्जा’ हे नाव लेखिकेने या कादंबरीला दिले आहे. धार्मिक कट्टरवाद व माणुसकी यांचा संघर्ष लेखिकेने प्रभावीपणे चितारला आहे. ह्या कादंबरीत हिंदूंची बाजू घेऊन मुसलमानांवर कठोर टीका केली आहे. त्यांची जुलमी मानसिकता चित्रित करून त्यांचा रोष पत्करला. म्हणूनच मुल्ला-मौल्लवींनी लेखिकेला ठार मारण्याचा फतवा काढला आहे. परंतु धर्मांच्या नावाखाली दुसऱ्याचा छळ करणाऱ्या, एका जातीची हत्या करणाऱ्या व जातीयवाद पसविणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा पुकारण्याचा लेखिकेचा निश्चय आहे. ‘लज्जा’ ही कादंबरी ही सामुदायिक पराभवाची कथा असल्याचे लेखिकेचे मत सर्वांनाच मान्य होणार आहे. एक धर्म दुसऱ्या धर्मांशी समांतर असतो. सर्वच धर्मसंस्थापकांनी मानवतेचा संदेश दिला आहे. एक जात दुसऱ्या जातीशी मैत्रीनेच वागली पाहिजे. कुणी कुणाचा द्वेष करू नये. एखाद्याचे नुकसान करण्यासाठी आपली शक्ती खर्ची घालू नये, असेच तत्त्वज्ञान सर्व धर्मात सांगितलेले आहे. मग धर्माच्या नावाखाली जातीच्या अभिमानाने माणसामाणसांमध्ये भिंती घालणे अमानुषपणाचे आहे हे सूत्र प्रकर्षाने या कादंबरीत स्पष्टपणे रेखाटले असल्याने सर्वांनाच विचार करायला लावले आहे. सर्वधर्मीयाचा क्रोध पत्करून धाडसाने सत्याचे दर्शन घडवून लेखिकने एक क्रांतीच केली आहे म्हणूनच ‘लज्जा’ ही क्रांतिकारक कादंबरी आहे असेच म्हणायला हवे.