मुखपृष्ठ
लॉस्ट होरायझन

माझे शेल्फ

लॉस्ट होरायझन

इंग्रजी शीर्षक
Lost Horizon
सारांश

अनुवादित पुस्तकांच्या जगात सध्या अमाप पीक आले आहे.मराठी वाचकांना वेगळ्या अनुभवांनी मंत्रमुग्ध करणारे हे साहित्य जितके चित्तथरारक आहे तितकेच ते अंतर्मुख करते. त्यापैकीच ‘बेस्ट होरायझन’ ही कादंबरी आहे. जेम्स हिल्टन हा लेखक १९०० ते १९५४ या काळात झालेला ्रिटिश माणूस. ‘गुडबाय, मिस्टर चिप्स!’ हा त्याचा गाजलेला चित्रपट १९२० मध्ये त्याची ‘कॅथरिन हरसेल़्फ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. १९४२ मध्ये ‘मिस्टर मिनिव्हर’ या चित्रपट कथेस त्याला अकॅडमी अॅवॉर्ड मिळाले. स्नेहल जोशींनी केलेल्या अनुवादाचे वैशिष्ट्य हेच आहे की, एका रहस्यमय गोष्टीची उकल करताना एक स्वतंत्र मराठी कादंबरीचा आस्वाद घेतल्याचा आनंद देतो. हिमालयाच्या हिमपर्वतांच्या रांगा, तिबेटच्या एका दरीत शांग्री-ला नामक मठ आहे. त्याचे गुपित समजल्यावर वाचक चक्रावतो. हिदुस्थानातून अपहरण केलेल्या एका विमानास चुकून (?) अपघात होतो आणि ह्यूज कॉन्वे नामक नायकास त्या मठात आणले जाते. पुढे अनेक प्रश्न उभे राहतात. हे विमानोड्डाण केले कुणी? त्यामागे कुणाचे कटकारस्थान आहे? लामासारख्या साधू माणसाला ते गूढ कायम ठेवून काय साधायचे आहे? त्यात एका चिनी सुंदरीचा काही सहभाग आहे का? हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तक वाचायला हवे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद