मुखपृष्ठ
माझी जीवनयात्रा

माझे शेल्फ

माझी जीवनयात्रा

इंग्रजी शीर्षक
Mazi Jivan Yatra
सारांश

देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्या व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.लेखिका सुप्रिया वकील यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद खूप सुंदर भाषाशैलीमध्ये केलेला आहे. चला तर जाणून घेऊ, या पुस्तका विषयी. भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे त्यांना जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. “ माझी जीवन यात्रा “ हे एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र आहे. डॉक्टर अबुल पाकिर जैनुलब्दीन कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वर येथे झाला. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी “एरोनॉटिकल इंजीनियरिंग” चा अभ्यास केला. भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी चा प्रक्षेपक “SLV-3” तयार करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आणि त्या प्रक्षेपकाद्वारा १९८० मध्ये "रोहिणी" उपग्रह प्रक्षेपित केला. या त्यांच्या कामगिरीमुळे भारताचा "स्पेस क्लब" मध्ये प्रवेश झाला . त्यानंतर भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे तयार करून ती कार्यान्वित करण्यात आली आणि १९९८ मध्ये भारतात अणू चाचण्या घडविण्यात ही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. देशातील अग्रणी शास्त्रज्ञ तसेच "टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन आणि फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिल"चे अध्यक्ष म्हणून पाचशे तज्ञांच्या मदतीने टेक्नॉलॉजी विजन २०२०, तयार करून एक प्रगत राष्ट्र म्हणून भारतामध्ये बदल घडवून आणण्यात त्यांचा पुढाकार होता. १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने , १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २५ जुलै २००२ रोजी डॉक्टर कलाम भारताचे राष्ट्रपती बनले, ते देशाचे अकरावे राष्ट्रपती होते. "माझी जीवन यात्रा" मध्ये अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील, अगदी बालपणापासून ते वयाचा ऐंशीच्या टप्पा पार करेपर्यंतच्या काळातील काही खास आठवणी जागवल्या आहेत. या सगळ्या प्रवासात अनुभवांचे हे सगळे खंड वेचताना मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि ती म्हणजे प्रत्येकाने आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वप्न उराशी बाळगली पाहिजेत आणि मग ती साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे. असं केल्यास यश दूर नाही. अब्दुल कलाम सांगतात ही स्वप्न म्हणजे आपल्याला झोपेत पडतात ती नव्हेत ही स्वप्न अशी असली पाहिजेत जी आपल्याला झोपच येऊ देणार नाहीत. या पुस्तकात त्यांनी आयुष्यात आजवर न लिहिलेल्या छोट्या छोट्या फारशा परिचित नसलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी लिहिल्या आहेत. ते सांगतात, त्यांच्या आई वडिलांनी जी मूल्य व नीतिमत्तेची जाणीव रुजवली ती त्यांनी शेवटपर्यंत आत्मसात केली. एकदा अब्दुल कलाम यांचे स्नेही प्रोफेसर अरुण तिवारी यांनी त्यांना एक वेगळाच प्रश्न केला, कलाम साहेब तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रवास एका वाक्यात कसे सांगाल ? त्यांच्या या प्रश्नावर त्यांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, माझ्या आयुष्याबद्दल म्हणता येईल की भरभरून प्रेम लाभले लहान मुल...... संघर्ष.... आणखी संघर्ष.... दुःखाचे कढत अश्रू ..... मग आनंदाश्रू ........ आणि अखेर सुंदर व सुफल आयुष्य ..... पूर्ण चंद्रबिंब उमटताना पहावं तसं..... ! या पुस्तकाचा शेवट करताना कलाम साहेब म्हणतात कठोर परिश्रम, निष्ठा, अभ्यास आणि ज्ञान उपासना अनुकंपा आणि क्षमाशीलता या गोष्टी माझ्या जीवनात पायाभूत आहेत.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद