मुखपृष्ठ
मांजराची सावली

माझे शेल्फ

मांजराची सावली

इंग्रजी शीर्षक
Manjarachi Savali
सारांश

मांजराची सावली भयकथासंग्रहात जयश्री कुलकर्णी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निवडक भयकथांचा समावेश आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतला थरार आणि भयनाट्य काळजाचा ठोका चुकवणारे आहे. अतिंद्रिय, अनाकलनीय प्रसंगाच्या रोमांचकारी घटना जेव्हा आपल्यासमोर साकार होऊ लागतात तेव्हा त्या त्या व्यक्तींच्या मनातील ताणाचे आणि भयाचे प्रक्षेप आपल्याही मनावर येऊन आदळतात. शब्दाशब्दांतून अघोरी वासनांच्या क्रौर्याची धग आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ, घामाघूम करते. ...आणि मग या शब्दभ्रमाच्या मायाजालातून वेगळे होऊन आपण जेव्हा पुन्हा आपल्या नित्याच्या वास्तव जगात परत येतो, तेव्हा आपल्याच सावलीकडे पाहतानाही आपल्याला क्षणभर विलक्षण भीती वाटते.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
170
भाषा
मराठी
किंमत
130.00
समुदायाने जोडले
बंद