माझे शेल्फ
माफिया क्वीन्स ऑफ मुंबई
गुन्हेगारी जगताबद्दल विषेशतः अंडरवर्ल्ड बद्दल सर्वसामान्य माणसांपासून सगळ्यांनाच भीतीयुक्त कुतूहल असतं. त्यातही मुंबईतले माफिया आणि त्यांचे काळे धंदे यावर विपुल लिखाण झालंय, त्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित चित्रपट पण निघालेत(दिवार ,वन्स अपॉन या टाईम न मुंबई, शूट आउट at वडाळा.. ही काही उदाहरण) हाजी मस्तान , करीम लाला , वरदराजन मुदलियार यासारख्या नामचीन भाईंपासून सुरू झालेली ही परंपरा आत्ताच्या दाऊद इब्राहिम ते रवी पुजारी पर्यंत अविरत सुरू आहे. यातले सगळे डॉन , माफिया , जास्तकरून पुरुष .. पण या क्षेत्रात एकेकाळी स्त्रियांची पण मक्तेदारी होती किंबहुना मुंबईतील या लेडी डॉन ना मस्तान, करीमलाला , दाऊद सारखे लोक पण वचकून असायचे अस सांगितलं तर कित्येकांना ते खरं वाटणार नाही . पण ही वस्तुस्थिती होती. कित्येकदा दोन टोळ्यांमधल्या मांडवली साठी या लेडी डॉन पुढाकार घेऊन यशस्वी तोडगे काढायच्या. या लेडी माफियांबद्दल माहिती होण्याचं कारण म्हणजे .. पत्रकार एस. हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस यांनी लिहिलेलं.. माफिया क्विन्स ऑफ मुंबई हे पुस्तक. उल्का राऊत यांनी मराठीत अनुवाद केलाय. नुकतच वाचनात आलं. अतिशय सुरेख माहिती दिलीय त्यात . कित्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन झैदी आणि बोर्जेस यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग लिहिलेत यात. १.चावलवाली ते दारुवाली असा पल्ला गाठणारी हाजी मस्तान जिला मोठी बहीण मानायचा आणि दाऊद आई मानायचा ती झैनब उर्फ जेनबाई २.कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी अस बिरुद प्राप्त होऊनही इमानदारीत धंदा करणारी गंगुबाई कोठेवाली.. ही प्रत्यक्षात एका खानदानी आणि सधन कठियावडी कुटुंबात जन्मलेली होती. वडील प्रतिथयश वकील होते.. पण नशिबाच्या फेऱ्यात सापडली आणि ... ३.पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम बरोबर दोन हात केलेली.. सपना उर्फ अश्रफ ४.मध्य मुंबईत राहून अमली पदार्थाच्या व्यापारात स्वतःच मोठं साम्राज्य असलेली ..ज्योती आदिरामलिंगम, महालक्ष्मी पापामणी या तत्कालीन लेडी माफिया. त्याचबरोबर पतीच्या खांद्याला खांदा लावून अंडरवर्ल्ड मधे दबदबा असणाऱ्या बायका आशा गवळी..अरुण गवळी ची बायको नीता नाईक..अश्विन नाईक सुजाता निकाळजे..राजन निकाळजे उर्फ छोटा राजन पद्मा पुजारी.. रवी पुजारी या सगळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी ..माफिया क्विन्स ऑफ मुंबई हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा.