माझे शेल्फ
मार्कर
रॉबिन कुक यांच्या लेखणीतून उतरलेला अजून एक थरार. न्यूयॉर्क मधील काही हॉस्पिटलमध्ये अचानकपणे तरुण आणि निरोगी, पण काही साध्याश्या उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू व्हायला लागतो. डॉक्टर लॉरी माँटगोमेी आणि डॉक्टर जॅक स्टेपल्टन या सरकारी हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन म्हणजे पोस्ट मार्टेम विभागात काम करत असलेल्या मेडिकल एक्झॅमिनरना या विषयी शंका येते. शव विच्छेदनात तर मृत्यू तर नैसर्गिक वाटतो. पण यात काहीतरी लपलेले आहे हे कळल्याने , लॉरी अजून खोलात जाऊन मृतदेहांची शास्त्रीय तपासणी करवून घेते. कोण मारत आहे या निरागस लोकांना आणि का? आधुनिक प्रगत चाचण्या आणि त्यामुळे मनुष्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य रोगाची माहिती कशा साठी वापरली जाते? त्याचा फायदा कुठल्या क्षेत्रातील बड्या धेंडं उठवतात? काय आहे यांची खून करण्याची पद्धत जी शवविच्छेदन मध्ये सुद्धा सहज सापडू शकत नाही? पाठोपाठ होणारे मृत्यू , त्याचा शवविच्छेदनाच्या चाचण्या, गुन्हेगारपर्यंत पोहचण्याची धडपड.. एक वैद्यकीय क्षेत्रातील एका प्रकारची अपप्रवृत्ती दाखवणारी कादंबरी वाचावी अशी.