मुखपृष्ठ
मायक्रो

माझे शेल्फ

मायक्रो

इंग्रजी शीर्षक
Micro
सारांश

होनोलुलूमधल्या एका बंदिस्त ऑफिसमध्ये तीन माणसे मृत्युमुखी पडलेले सापडतात. तिघांच्याही अंगावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा होत्या.त्यातील एकजण नुकताच नॅनीजेन कंपनीच्या ऑफिसची गुप्त पाहणी करून आला होता. नॅनीजेन ही सूक्ष्मजीवशास्त्रावर संशोधन रणारी आघाडीची कंपनी आहे.हवाई बेटावर त्यांची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे.हवाईच्या घनदाट वर्षारण्यात त्यांचे संशोधन चालू आहे. नॅनीजेन केंब्रिजमधील सात विद्यार्थ्यांना हवाई येथे संशोधनासाठी आमंत्रित करते.त्यात पीटर ही आहे ...ज्याचा भाऊ नॅनीजेनचा उपाध्यक्ष होता आणि अचानक बोटीवरून नाहीसा झालाय. पीटर हा विषारी द्रवे आणि विषबाधा या विषयात तज्ञ आहे . रिक वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतोय .कॅरेन ही तरुणी कोळी विंचूसारख्या प्रजातीचा अभ्यास करतेय .एरिका किटकशास्त्र तज्ञ आहे.अमरसिंग हा वनस्पतींमधील हार्मोन्सवर अभ्यास करणारा तरुण आहे .जेनी ही तरुणी वनस्पती आणि प्राण्यांमधील रासायनिक संदेशवहन गंधाचा अभ्यास करतेय .तर डॅनी आकृतिबंधातील रचनात्मक बदल या विषयावर पीएचडी करतोय . असे हे सात विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांना नॅनीजनने केलेल्या अविश्वसनीय प्रयोगाची माहिती मिळते.त्याचबरोबर पीटरच्या भावाचा खून ड्रेक या नॅनीजेनच्या अध्यक्षांनी केलाय हे ही कळते.ड्रेक त्यांच्यावर आपला हुकमी प्रयोग करतो आणि त्यांना हवाईच्या घनदाट वर्षारण्यात सोडून देतो. आता ते सातजण आणि त्यांच्यासोबत प्रयोगात ओढला गेलेला नॅनीजेनचा एक कर्मचारी अश्या वातावरणात आहेत जिथे पावलोपावली मृत्यू आहे . त्यांची शारीरिक ताकद ही काही उपयोगाची नाही . त्यांना आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचाच वापर करून आपल्या मूळ स्वरूपात परतायचे आहे. मायकेल क्रायटन हे प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक . त्यांची ज्यूरासिक पार्क कादंबरी खूप गाजली . ही कादंबरी पूर्ण होत असताना मृत्यूने त्यांना गाठले तेव्हा रिचर्ड प्रेस्टन यांनी ही कादंबरी पूर्ण केली .

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद