माझे शेल्फ
मदर तेरेसा : प्रतिमेच्या पलीकडे
चिंतनात्मक चरित्र… साता समुद्रापलीकडून केवळ नि:स्वार्थ भावनेने गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आलेल्या आणि हा देश आपलाच आहे असे अभिमानाने सांगणाऱ्या मदर तेरेसा यांचे संपूर्ण चरित्र प्रथमच पुस्तकरुपाने वाचकांपुढे आले आहे. मदर तेरेसा नेमक्या कोण आणि कुठूनआल्या, त्यांनी काय केले यांची सरळ मांडणी न करता त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांचा वेधही या पुस्तकात घेण्यात आला आहे. मदर तेरेसा यांना विरोध करणाऱ्यांचा विरोध नेमका कशाला होता आणि त्यातून मदरची प्रतिमा कशी उजळली याचे केवळ विश्लेषण या पुस्तकात नाही; तर मदर तेरेसा यांचे वस्तुनिष्ठ कार्यकर्तृत्वच या पुस्तकात रेखाटण्यात आले आहे. जे घडले ते तसेच वाचकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न अॅन सेबा यांनी केला आहे. अॅन सेवा या ज्यू असून त्यांनी मदरच्या जीवनचरित्रासाठी किती परिश्रम घेतले आहेत, कोणकोणत्या कोनातून मदरच्या जीवनाचा आढावा घेतला आहे, हे पाहून थक्क व्हायला होते. एका अत्यंत श्रेष्ठ चरित्रनायिकेला एका असामान्य चरित्रकर्तीने केलेला मानाचा मुजरा असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे अनंत बेदरकर यांनी!