माझे शेल्फ
मेरा परिवार
रशियाचा ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर’ हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची़ परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेव्हिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...नटालिया अलेक्जेंद्रोवना फ्लौमरा या सोव्हिएट महिलेची आत्मकथनपर कादंबरी म्हणजे ‘मेरा परिवार’ हे पुस्तक. मूळ रशियन आता हिंदीमधून विमल लिमये यांनी प्रवाही शैलीत मराठीत आणलेलं. ही मुलं त्यांची स्वत:ची नाहीत, त ती दत्त्तक घेतलेली.दत्तक घेण्यासाठी आपल्याकडे त्या मुलाला देण्यासाठी काहीतरी डबोलं - गडगंज संपत्ती असायला हवी या विचाराला हे पती-पत्नी छेद देताना दिसतात. आपल्या मनातला वात्सल्यभाव सत्कारणी लावताना मुलांना उत्तम नागरिक बनवावं ही त्यांची प्रबळ प्रेरणा दिसते. स्वत:च्या मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीशी सामना करत नटालिया पाच मुलांना वाढवते, स्वावलंबी आणि सुसंस्कारी बनवते. वाममार्गालासुद्धा लागलेल्या मुलांना न मारता, फार मोठ्या कडक वाटणाऱ्या शिक्षा न करता ती कशी सुधारते आणि त्यांच्यात माणुसकीचं नातं कसं जागवते हे त्या अनुभवातूनच लक्षात येत जातं.