मुखपृष्ठ
महात्मा (ज्योतिराव फुले)

माझे शेल्फ

महात्मा (ज्योतिराव फुले)

इंग्रजी शीर्षक
Mahatma ( Jyotirao Phule )
सारांश

महात्मा फुल्यांवरील लक्षवेधी कादंबरी... महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील एक नवी कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. डॉ. रवींद्र ठाकूर यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी कादंबरीत महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र जीवनचरित्र कादंबरीत मांडण्यासाठी डॉ. ठाूर यांनी घटना-प्रसंगांची जी साखळी वापरली आहे, त्याला खरोखरच तोड नाही. कारण म. फुले यांचे विचार घटना प्रसंगांच्या माध्यमातून मांडणे हे खरोखर कठीण होते. परंतु ते अवघड असे कार्य डॉ. ठाकूर यांनी सहजपणे साध्य केले आहे. शुद्रातिशुद्र मुलामुलींसाठी शाळा स्थापना, विधवापुनर्विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, दुष्काळग्रस्तांसाठी सुरू केलेले अन्नछत्र, सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे लेखन, शेवटी मनाला चटका लावून जाणारा म. फुले यांच्या मृत्यूचा दु:खद प्रसंग आणि त्याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेले धैर्य व प्रसंगावधान अशा कितीतरी घटना या कादंबरीत अगदी सहजपणे समोर येत राहतात. कादंबरीत कंटाळवाणा किंवा रुक्ष असा प्रसंग नाहीच. स्त्रीशुद्रातिशुद्रांना ब्राह्मण आणि तत्कालीन प्रतिष्ठितांच्या दास्यातून मुक्त करण्याचे फार मोठे कार्य म. फुले यांनी केले. त्यांच्या जीवनातील कित्येक घटना हृदयद्रावक, संघर्षमय, आणि थरारक स्वरूपाच्या आहेत. त्या सर्व घटनांचे चिंताकर्षक असे वर्णन या कादंबरीत आले आहे. ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याची स्वप्ने पाहणारे जोतिराव आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नसमारंभात झालेल्या घोर अपमानामुळे अंतर्मुख होतात. आपण ब्रिटिशांच्या दास्यातून भारताला मुक्त करण्याचे स्वप्न पाहत आहोत, परंतु त्यानंतर आपल्या समाजाला खरे स्वातंत्र्य मिळणार आहे काय, हा प्रश्न त्यांना छळू लागतो. कंपनी सरकार गेल्यानंतर पुन्हा पेशवाईचीच स्थापना होणार असेल तर स्त्रीशूद्रातिशूद्रांना पुन्हा अन्याय अत्याचारच सोसावे लागणार आहेत ही वस्तुस्थिती त्यांना बेचैन करू लागते. त्यातूनच त्यांचे मतपरिवर्तन होते आणि त्यांच्या मनात समाजक्रांतीची बिजे पेरली जातात. टॉमस पेन यांच्या विचारांनी भारावून जाऊन आणि डॉ. मरेमिचेल यांच्यासारख्या खिस्ती मिशनऱ्यांच्या सहवासाने प्रेरित होऊन ते स्वत:ला शिक्षणकार्यासाठी वाहून घेतात. जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या क्रांतिकारक कार्यात त्यांचे ब्राह्मण मित्रही सहभागी झाले. सुरुवातीला ते सर्वजण एकाच विचाराने प्रेरित झालेले होते. त्यांच्यात वैचारिक एकोपा होता. परंतु नंतर ध्येयधोरणाविषयी मतभेद होऊन फुट पडते. ते सगळे कसकसे घडते त्याचे फार उत्कृष्ट असे चित्रण डॉ. ठाकूर यांनी केले आहे. शिक्षणकार्याला वाहून घेतलेल्या त्या मित्रांमध्ये मतभेद होतो, ते ती शाळेत काय शिकवले जावे या प्रश्नावरून, परंतु म. फुले आप्ल्या विचारांवर ठाम आहेत. जे न्याय्य वाटते, सत्य वाटते त्यासाठी ते कुठलीही तडजोड करत नाहीत. अशा या उमेदीच्या काळात जोतिरावांवर टॉमस पेन या अमेरिकन विचारवंतांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडतो. त्याने लिहिलेल्या ‘राइटस् ऑफ मॅन’, ‘एज ऑफ रिझन’ या ग्रंथांच्या वाचनाने जोतिरावांच्या मनात निर्माण झालेली भावनिक प्रतिक्रिया म्हणजेच त्यांनी उभारलेले सामाजिक क्रांतीचे कार्य! म. फुले यांनी उभारलेल्या त्या बंडाचा समग्र इतिहास या कादंबरीत ग्रंथित झाला आहे. म. फुले यांच्या जीवनात घडलेल्या त्या सर्व घटनांना कादंबरीचे रूप देण्यात लेखक डॉ. ठाकूर यांनी असामान्य यश मिळविले आहे. ‘महात्मा’ वाचणारा प्रत्येक वाचक त्या घटनांचे चित्रमय वर्णन कायमचे स्मरणात ठेवू शकतो. अर्थात त्याचे श्रेय लेखकाचया वर्णनकौशल्यालाच द्यावे लागेल. ‘महात्मा’ ही कादंबरी म्हणजे जोतिराव फुल्यांची चरितकहाणी असली तरी या कादंबरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचेही चरित्र आले आहे. पतीवर नि:स्सीम प्रेम करणारी, त्याने अंगिकारलेल्या कार्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यात सहभागी होणारी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणून सावित्रीबार्इंचे व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे नजरेत भरते. म. फुल्यांनी अंगीकारलेल्या कार्यात त्यांनी महत्त्वाटा उचलला आहे. कदाचित सावित्रीबार्इंच्या सहाकार्याशिवाय म. फुले एवढं कार्य करूच शकले नसते. आपला गृहिणीधर्म सांभाळून शिक्षिकेच्या नात्याने सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे. एकशे एकोणनव्वद व्यक्तिरेखा असलेल्या या कादंबरीत सावित्रीबाई यांच्याखेरीज सदाशिव गोवंडे, सरस्वतीबाई गोवंडे, मोरोपंत वाळवेकर, कृष्णराव भालेकर, ग्यानोबा ससाणे शाहीर धोंडिराम कुंभार, धोंडिबा रोडे, तात्यासाहेब रोडे, लहुजी बुवा, डॉ. मिचेल, भाऊ पाटील, सगुणा आऊ, नारायणराव लोखंडे, लोकहितवादी न्या. रानडे, बाबा पद् मनजी इ. अनेक लहानमोठ्या व्यक्तिरेखांचा समावेश असून त्या त्या व्यक्तींचे अत्यंत मार्मिक असे स्वभावरेखन लेखकाने केले आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद