मुखपृष्ठ
मी तिरस्कार करणार नाही

माझे शेल्फ

मी तिरस्कार करणार नाही

इंग्रजी शीर्षक
Mi Tiraskar Karnar Nahi
सारांश

एका मनस्वी डॅक्टरचा थक्क करणारा जीवनप्रवास ! ईझेलादिन अबुइलेश हे एक पॅलेस्टिनी डॉक्टर आहेत. त्यांचे बालपण गाझापाट्टीतील जबलिया निर्वासित छावणीत गेले. जिथे जन्मदेखील झाला. ते स्त्रीरोगतज्ज्ञ होते. शिवाय ‘वंध्यत्वावर उपाय’ या शास्त्रावर त्यांचे विशेष ्रभुत्व आहे ते गाजत राहत होते; परंतु कमला ते इस्रायलच्या हॉस्पिटलला जात असत. तिथे त्यांचे बहुतांश आयुष्य गेले. हॉर्वर्डमध्ये त्यांनी ‘सार्वजनिक आरोग्य’ या विषयात प्रशिक्षण घेऊन प्रावीण्य मिळवले. या विषयावरील त्यांची मते आणि त्यांचे संशोधन जगभरात प्रमाण मानले जाते. टोरोंटो विश्वविद्यालयातील डल्ला लाना प्रशालेत ते सहप्राध्यापक आहेत. ही प्रशाला सार्वजनिक आरोग्य या विषयाचे प्रशिक्षण देते. गाझापट्टीला डॉक्टर आपली मायभूमी मानतात. संबंध मध्य पूर्वेत त्यांनी सुचवलेला औषधोपचार प्रमाण मानला जातो. त्यांनी मायभूमी मानत असलेल्या प्रदेशाला जग मात्र जगातील सर्वांत मोठ छळछावणी मानते. या भागात पंधरा लाख पॅलेस्टिनी हे तीनशे साठ चौरस किलोमीटर एवढ्या जमिनीवर दाटीवाटीने राहत होते त्यामुळे अशा भागाची प्रगती होऊ शकेल, असे मत या पुस्तकात मांडले. डॉक्टर या नात्याने ते सीमेच्या दोन्ही बाजूकडील रोग्यांना औषधोपचार तसेच वयात येणाऱ्या मलींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा अनुभव यात मांडले आहेत. त्याचप्रमाणे मुलींना स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळावे याचे महत्त्व आणि गरज या गोष्टी त्यांनी तेथील लोकांना पटवून दिले आणि शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. १६ जानेवारी २००९ मध्ये इस्रायल बॉम्बहल्ल्यात ईझेलादिन यांच्या मुली आणि पुतणी मारल्या गेल्यामुळे त्यांनी हे कार्य जोमाणे अंगीकारले. त्यांच्यावर झालेल्या या आघाताला त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याचे वर्णन केले. त्यामुळे त्यांचे कार्य जगातील सर्व लोकांच्या अंतकरणात ठसले गेले. विशेषत: इस्रायलमध्ये याचा परिणाम जास्त प्रकर्षाने दिसून आला याबद्दलची माहिती दिली आहे. डॉक्टरांनी त्या भागातील लोकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे आणि शांततेकरता योग्य कृती करण्याचे आव्हान केल्याचे स्पष्ट केले होते. ते सध्या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ धर्मार्थ संस्था उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. मुली आणि स्त्रिया यांना आरोग्य आणि शिक्षण या द्वारामुळे शारीरिक आणि मानसिक ताकद मिळून त्या प्रबळ भाव्यात उद्देशाने या लेखकांनी केलेल्या कार्याचे लेखन या पुस्तकात आहे.

पुन्हा मायदेशी जायचं तिचं स्वप्न आहे, मात्र बर्मिंगहॅममध्ये राहूनही तिनं तिचं काम सुरू ठेवलंय.मलाला आता केवळ पाकिस्तानची नव्हे साऱ्या जगाची कन्या आहे. अक्षरांची ताकद तिनं ओळखलीय. ही शक्ती जगभरातल्या मुलींना मिळावी यासाठी तिनं गोळ्या झेलल्यात आणि त्यातूनही ती पुन्हा उभी आहे. लहानपणी उंची वाढवण्यासाठी प्रार्थना करणारी मलाला आता आभाळाएवढी उंच झालीय... म्हणूनच स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक मुलीने अन् तिच्या स्वप्नांना फुलवण्यासाठी खंबीरपणे मागे उभे राहणाऱ्या सगळ्यांनीच मलालाची गोष्ट वाचायला हवी.

मलाला जन्मापासून वडिलांचा शाळा सुरू करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी आणि नंतरच्या काळात ती जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहते आहे. एका अर्थाने शाळेच्या अंगणातच ती वाढली आहे. घरात आईच्या धार्मिक संस्कारासोबत वडिलांचे विचार, त्यांच्या कविता ती ऐकते. कचऱ्यात भंगार वेचणारी छोटी मुलं, हिशोब करता येत नाही म्हणून संत्रे विकताना रेषा ओढणारी मुलगी, शाळा अर्धवट सोडून संसाराला लागलेल्या तिच्या वयाच्या मुली हे सारं तिला अस्वस्थ करतं.दहा-बारा वर्षांच्या मुलीची ही संवेदनशीलता आणि ते दर्शवणारे पुस्तकातले प्रसंग मुळातून वाचण्यासारखे. आजूबाजूचं बदलतं राजकारण मलाला बारकाईने टिपते. ९/११ च्या घटनेनंतर अफगाणिस्तानच्या टेकड्यांमध्ये पोसलेला तालिबान स्वातमध्ये उतरला. त्याआधी नाटो फौजांविरुद्ध पाक लष्कराच्या अनुमतीने गेलेले १२ हजार स्वाती तरुण कधी घरी परतलेच नव्हते. याच काळात मिंगोरात आलेल्या एका मुफ्तींनी मुलींच्या शाळा बंद करण्यासाठी कारवाया सुरू केल्या. मुलींचं शाळेत जाणं धर्मविरोधी असल्याचं सांगत लोकांना फितवायला सुरुवात केली. त्यानं स्वातमधलं संगीत बंद केलं. एका नृत्यांगनेला ठार करून तिचा मृतदेह चौकात आणून कसा ठेवला, तो प्रसंग मलालाच्या शब्दांत वाचताना अंगावर शहारे येतात. स्वातचं तालिबानीकरण होण्याचा प्रक्रिया मलाला विस्ताराने सांगते. बुरखे घालण्याची सक्ती झाली, जुन्या बुद्धमूर्ती फोडल्या, टीव्ही बघायला बंदी केली, बायकांचं घराबाहेर पडणं बंद झालं. मुलींच्या शाळा बंद पाडल्या जाऊ लागल्या, सांगूनही ऐकलं नाही तर उडवून दिल्या गेल्या, शिक्षकांवर हल्ले झाले. या वातावरणात मुलं कशी वाढत होती, हे ऐकताना अक्षरश: धक्का बसतो. क्रिकेट अन् विटीदांडूऐवजी मुलं लष्कर विरुद्ध तालिबान खेळत. मलालाने लिहिलंय, एकदा तिचा धाकटा भाऊ बागेत त्वेषाने खणत होता, कारण विचारले तर म्हणाला, ‘कबर खणतोय...’ याच दरम्यान मलाला आणि तिचे वडील वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर जाऊन स्वातमधल्या मुलींच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या हक्कांवरील अतिक्रमणांबद्दल बोलत होते. गुल मकई या टोपण नावानं मलालानं बीबीसीसाठी एक कॉलमही लिहिला. स्वातमधल्या मुली भयाच्या सावटाखाली कशा जगताहेत, हे जगभर पोहचलं. दुसरीकडे शाळेतून मुलींची गळती सुरूच होती. २००९ मध्ये मलालाच्या वर्गात २७ पैकी १० मुली उरल्या. अख्ख्या स्वातमध्ये ५० हजार मुलींना शाळेत जाण्यापासून रोखलं गेलं होतं. परिस्थिती इतकी बिघडली की तालिबान्यांना हुसकवण्यासाठी लष्कराने स्वातचा ताबा घेतला. स्वाती लोकांना आपल्याच गावातून, आपल्याच घरातून परागंदा व्हावे लागले. मलालाच्या लेखणीतून हा प्रसंग आणि त्याकाळात झालेली फरपट वाचताना संताप येतो. दोन महिन्यांत तिच्या कुटुंबाला चार गावं फिरावी लागली. तीन महिन्यांनी ती मिंगोरात परतली, तेव्हा संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं होतं. मलाला आणि पाकिस्तानात महत्त्वाची व्यक्ती झाली होती. कराची, लाहोर, इस्लामाबादच्या भेटी देऊन तिथल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी स्वातमधल्या मुलींची प्रतिनिधी म्हणून शिक्षणाच्या हक्कासाठी आग्रह धरत होती. याच काळात एका दौऱ्यादरम्यान मलालाला इंटरनेटवरून पहिली धमकी आली. भय आणि दहशत घरापर्यंत येऊन पोहोचलं होतं. याआधी तिच्या वडिलांना धमक्या येत होत्या, पण यावेळचं प्रकरण गंभीर होतं. हे भीतीचं सावट इतक होतं की मलालाला गोळ्या घातल्याची, अॅसिड फेकल्याची स्वप्नं पडू लागली. प्रार्थना सुरू झाल्या आणि... एक दिवस ते घडलंच. परीक्षा देऊन परतत असताना तिच्या बसवर गोळीबार झाला. गोळी थेट डोक्यात घुसली. त्यानंतर तिच्यावर पेशावर, इस्लामाबादेत झालेले उपचार, त्यातलं राजकारण, तिला परदेशी हलवण्याचा निर्णय, लष्करप्रमुख कयानी यांनी त्यात बजावलेली कळीची भूमिका मलालाच्या हल्ल्यादरम्यान दोन ब्रिटिश डॉक्टर पाकिस्तानात असण्याचा योगायोग... हे सारं रोमांचक. बर्मिंगहॅममध्ये तिच्यावर झालेल्या उपचारांचे ती एखाद्या तज्ज्ञांच्या भूमिकेत जाऊन वर्णन करते. यादरम्यान साऱ्या जगातून तिला तब्बल ८ हजार भेटकार्ड आली. हजारो भेटी आल्या. या हॉस्पिटलच्या मुक्कामातला एक हळवा क्षण मलालानं सांगितलाय. तिला मिळालेली सर्वांत मोठी भेट होती ती, बख्तावर आणि बिलावल या बेनझीर यांच्या मुलांनी मलालाला पाठवलेली त्यांच्या आईची शाल. त्या शालीवर तिला एक लांबसडक काळाभोर केस सापडला होता. अनेक छोट्या-मोठ्या ऑपरेशन्सला सहजपणे सामोरी गेलेली मलाला प्रदीर्घ उपचारांनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगतेय, पण तिच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा मायदेशात जाता आलेलं नाही. मलालानं लिहिलंय, ‘असं म्हणतात की, कोणताही पश्तून त्याच्या भूमीचा स्वेच्छेने त्याग करत नाही. त्याला गरिबीमुळे जावं लागतं किंवा तो प्रेमासाठी जातो’.... पण तिचं देशाबाहेर राहणं याहून वेगळं आणि वेदनादायी आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद