मुखपृष्ठ
मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा

माझे शेल्फ

मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा

इंग्रजी शीर्षक
Mitra Joda Ani Lonkanvar Prabhav Pada
सारांश

जगप्रसिद्ध लेखक डेल कार्नेगी यांनी लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक "How to Win Friends and Influence People" याचा मराठी अनुवाद म्हणजेच वरील पुस्तक होय. या इंग्रजी पुस्तकाच्या ५० लाखांपेक्षा जास्त प्रती विक्री झाल्या आहेत. तसेच या पुस्तकाचा ५० हून अधिक भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाला आहे व त्याच्या सर्व मिळून १० कोटी प्रती संपल्या आहेत. यावरूनच या पुस्तकाची महती लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांशी गोड बोलणे, समोरच्याचे कौतुक करणे, अपराध पोटात घालणे ही या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे. आजच्या काळात आपला दृष्टिकोन बदलणे अत्यंत गरजेचे आहे. हा बदल स्वत:त घडवून आणणे हाच स्वत:ला चिरकाल आनंदी ठेवण्याचा हमखास यशस्वी मार्ग आहे. पुस्तक एकूण चार भागात विभागले गेले आहे. भाग - १ मध्ये लोकांशी कसे वागावे याबद्दलची मूलभूत तंत्रे त्यामध्ये ३ प्रकरणे, भाग - २ - लोकांना तुमच्याशी सहमत करून घेण्याचे सहा मार्ग त्यामध्ये ६ प्रकरणे, भाग - ३ लोकांना जिंकून घेण्याचा मूलमंत्र यामध्ये १२ प्रकरणे आणि भाग - ४ मध्ये नेतृत्व स्वीकारा लोकांना राग येऊ न देता व आक्रमक होऊ न देता कसे बदलावे यामध्ये ९ प्रकरणे आहेत. शेवटी यश मिळविण्याचा झटपट मार्ग, या सर्व प्रकरणांमध्ये दिलेली उदाहरणे, माहिती व तत्वे अत्यंत उपयुक्त व सहज पटणारी अशी आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ व्हावा म्हणून नऊ सूचना केल्या आहेत. त्या प्रथम वाचा व त्याप्रमाणे पुस्तक वाचा. अ) लोकांवर तुमची छाप पडावी यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. ती पथ्ये तसेच काही गोष्टी करावयास नकार दिला, तर कोणती संकटे ओढवली जातील याबद्दल भाग-२ मध्ये विवेचन केले आहे. वादविवाद करण्याने काहीच साध्य होत नाही. तुम्ही वादविवादाने लोकांना कधीच जिंकू शकत नाहीत याबद्दल अनेक उदाहरणांनी ते भाग-३ मध्ये पटवून दिले आहे. चौथ्या भागात नेतृत्व ही कला आहे व त्याची महती किती आहे हे समजावून दिले आहे. आपण आपल्या शारीरिक व मानसिक ताकदीचा केवळ निम्मा भागच वापरतो. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले, तर मानव फार मर्यादेत राहतो. खरेतर त्याच्यामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे, पण ती वापरण्यात तो अपयशी ठरतो. या पुस्तकाचा मूळ उद्देश हाच आहे. ती ताकद शोधण्यास, वाढवण्यास व तिचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणे. ब) पुस्तकाचा लेखक डेल कार्नेगी यांचे बालपण व पुढील काही वर्षांचे आयुष्य अतिशय कष्टप्रद होते. त्यासंबंधीचा तपशील पान २४८ ते २५४ मध्ये लॉवेल थॉमस यांनी दिला आहे. तो प्रत्येकाने लक्षपूर्वक वाचावा असा आहे. क) अनुवादकर्त्याने ज्या पुस्तकाचे अनुवाद करायचे आहे त्याच्याशी किती एकरूप व्हायला पाहिजे त्याचे उदाहरण स्वयं अनुवादक अॅड. शुभदा विद्वांस आहे. पुस्तक वाचत असताना आणि पुस्तकातील विचारांवर चिंतन करताना त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडले. – पान बारा व तेरावर आपण स्वत: वाचा. हे पुस्तक स्वत: विकत घेऊन प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे आहे. नुसते वाचून उपयोगी नाही. त्यातील तत्वे आचरणात आणणे तितकेच गरजेचे आहे. व ती तत्वे आचरणांत आणल्यानंतर तुमचे अनुभव काय हे लिहिण्यासाठी पुस्तकाच्या शेवटी २ पाने जोडली आहेत, त्यावर हे अनुभव लिहून ठेवा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद