माझे शेल्फ
मंत्र श्रीमंतीचा
शून्यातून यशाचा किनारा गाठण्यासाठी... इंग्रजीत ‘हाऊ टू डू इट’ पुस्तकांची नेहमीच चली असते. त्यातला दादा माणूस म्हणजे डेल कार्नेजी. त्याची ‘हाऊ टु विन् फ्रेंड्स अँड एनफ्ल्यूयन्स पीपल’ किंवा ‘हाऊ टू स्टॉप वरीइंग’ ही पुस्तके शेक्सपिअरच्या नाटकाइतकीच लोक्रिय आहेत. त्यातच पोहणे, क्रिकेट, बुद्धिबळ वगैरे शिकविणारी अनेक खेळ वा व्यवसायांची पुस्तकं सारखी प्रसिद्ध होत असतात. मराठीतही शेअर बाजार, संगणकापासून ‘मजेत जगावं कसं’ यांसारख्या पुस्तकांस कथा-कादंबऱ्यांपेक्षा अधिक मागणी आहे. आध्यात्मिक विषयावरच्या पुस्तकांचीही चलती आहे. श्याम भुर्के यांचं ‘मंत्र श्रीमंतीचा’ हे त्यातलंच एक पुस्तक. ते मूळचे कॉमर्सचे अभ्यासक; पण त्यांना साहित्य, कला, नाट्य यांचीही आवड आहे. त्यांनी त्यावर हजारभर जरी उभारण्यानं दिली. शेवटी प्रत्येकाला कुठं सांगणार, म्हणून आपल्या अनुभवांना त्यांनी चक्क कादंबरीचं स्वरूप दिलं आहे. अर्थात त्यात कादंबरीचे घटक नावालाच आहेत. धनेश्वर आणि मनोहर या दोन गुरू-शिष्य संबंधांवर आधारित दोन व्यक्तिरेखांच्या आधारे त्यांनी श्रीमंतीचं रहस्य सांगितलं आहे. अर्थात अशा पुस्तकाचं मर्यादित स्वरूप लक्षात घेऊनच हा श्रीमंत होण्याचा मंत्र प्रत्यक्षात आणायला हवा. शेवटी ‘पोहावे कसे’ वाचून काही पोहता येत नाही. त्यासाठी पाण्यातच उडी ठोकावी लागते. मनोहर बुद्धिवंत याचे वडील अत्यंत बुद्धिवंत, पीएच. डी., एका विद्यापीठात विषय विभागप्रमुख. त्यामानाने धनेश्वर सामान्य त्यात आज ते अमाप श्रीमंतीचे धनी. ही किमया कशी घडली? त्याचे कारण आजचे शिक्षण हे कारकुनी घडविणारे आहे. त्यासाठी नोकरीच्या ‘स्कूटर रेस’मध्ये न पडता व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी अनेक वाटा आहेत. शाळेत शिकत असतानाच फटाके विकणे, स्टेशनरी शॉप चालविणे यांतून मनोहर स्वत:ची कमाई करतो. त्यातूनच धनेश्वर एकेक रहस्ये उघड करीत जातात. यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रमांना, कष्टांना पर्याय नाही, हा धनेश्वरांचा मुख्य मंत्र आहे. ‘खावी बहुतांची अंतरे’ हा दुसरा आणि दोन कारखाने चालवायचे हा तिसरा. त्यातला एक बर्फाचा नि दुसरा साखरेचा. म्हणजे डोकं थंड ठेवणं नि गोड बोलणं. यामुळेच ग्राहक राजा प्रसन्न होतो. मग गुंतवणुकीची विविध क्षेत्रं खुली होतात. त्यात बँका, मार्केटिंग, पर्यटन, ट्रेकिंग, चित्रकला वगैरे दिशा त्यांनी दाखविल्या आहेत. संगणक हा तर आज एक कल्पवृक्ष आहे. आणखी एक म्हणजे श्रीमंत स्वत: कधीच काम करीत नाहीत. ते फारसा कर भरत नाहीत. ते पंचतारांकित हॉटेलांत पाट्याग झोडत असतात. खरं काम त्यांचे पगारी नोकर करतात. कर कमीत कमी भरावा म्हणून ते तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेतात. त्यांच्या सगळ्या बिलांचा अंतर्भावही ते कंपनी खर्चत करून उत्पन्न व कर कमी दाखवतात. पगारदार मात्र स्वत: कर भरतात. त्यांची ओढाताण होते. श्रीमंत कधीही पैशासाठी काम करीत नाहीत. पैसाच त्यांच्यासाठी काम करतो, हे सत्य आहे. चिकाटी, श्रम, आळसाचा अभाव हे तीन मंत्रही महत्त्वाचे. त्याच जोरावर पुढं सिंधी मारवाड्यांपुढं गेले. जेवतानाही गिऱ्हाईक आलं तर ते पाटावरून उठतील. दुपारी एक ते चार दुकानाला विश्रांती देणारा माणूस त्याला कायमच विश्रांती देतो, हे धनेश्वरांचं निरीक्षण आहे. अॅसेट्स हे नेहमीच अॅसेट्स कसे नसतात, हे त्यांनी एका स्वतंत्र प्रकरणात नफा-तोटा, ताळेबंद, बॅलन्सशीट यांच्या उदाहरणांनी स्पष्ट केलं आहे. श्रीमंत पैसा मिळविण्यासाठी संपत्ती खर्च करतात. गरीब फक्त खर्चच करतात. मध्यमवर्गीय जी संपत्ती समजून खरेदी करतात ती अखेर लायबिलिटी ठरते. ती कशी टाळावी, हेही लेखकानं सांगितलं आहे. व्यवसायाला चिंतन, मनन याप्रमाणेच वाचनाची ही गरज आहे. त्यासाठी शंतनुराव किर्लोस्कर, टाटा कुटुंबीय, कॅमलचे दांडेकर, कल्याणी पगडीचं आत्मकथन, सिपोरेक्सचे बाबूराव शिर्के, तसेच अनेक पाश्चात्त्य यशस्वी उद्योगपतींच्या पुस्तकांची लेखकाने यादी दिली आहे. अशा प्रकारे नोकरीच्या मागे लागता श्रीमंत कसं व्हावं, हे अनेक किस्से, विनोद, हकिगती व प्रसंगांच्या रूपानं सांगितलं आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही.