माझे शेल्फ
मंतरलेले बेट
जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्युयॉर्कमधल्या मॅनहॅटन या रम्य बेटावर माझा जन्म झाला. मॅनहॅटन म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मा वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे ...आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही. मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्युयॉर्कची गल्लीन् गल्ली पालथी घातली. - पुस्तकामागून २० व्या शतकाच्या सुरवातीचा काळ एका लहान मुलाच्या नजरेतून मांडणारी ही कादंबरी. प्रत्येक गोष्ट आयुष्यात पहिल्यांदा पाहताना, अनुभवताना, शिकताना, जगताना नायकाची अवस्था तुम्हाला तुमच्या अनुभवांशी सांगड घालू पाहते. त्याच्यासाठी त्याचं हे गाव जगातलं सुंदर गाव आहे. तेच त्याच विश्व असतं पण मग जागतिक घडामोडिंनी त्याला जगाची होणारी ओळख, तेव्हाच त्याचं स्वत्वाचा शोध घेण खुपच रंजक आणि गुंतवून ठेवणारं आहे. ही कादंबरी नायकाच्या नजरेतून मंतरलेल्या बेटाची नक्कीच सफर घडवून आणते.