माझे शेल्फ
मुरली
वि. स. खांडेकरांनी १९६० पूर्वी लिहिलेल्या सुमारे १९ कथांचा संग्रह मेहता प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. अतिशय दुर्मिळ अशा या कथा यानिमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसमोर आल्या आहेत. या १९ कथांपैकी ‘मुरली’ या कथेची मध्यवर्ती कल्पना सांगायची झाल्या ती अशी, ‘‘नुष्य दुष्ट नाही, असे नाहीच पण त्याच्या दुष्टपणापेक्षा दुबळेपणातूनच, बौद्धिक आणि आत्मिक दुर्बलतेतूनच- आजच्या जगातली अनेक दु:खे निर्माण झाली आहेत. निसर्गाच्या सर्व प्रेरणा अंधपणाने मान्य करणारे आपले मन आणि मानवी संस्कृतीच्या प्रकाश रेखांवर प्रेम करणारे आपले मन यांच्या सनातन संघर्षाचे सत्य स्वरूप जाणण्याचे सामर्थ्य सामान्य मनुष्याच्या अंगी अजून आलेले नाही. विशेषत: यंत्रयुगाच्या आणि तयाने निर्माण केलेल्या असंख्य प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भव्य आणि सुंदर चित्र कसे रेखाटायचे, हे कोडे त्याला अद्यापि सुटलेले नाही. ते सुटेपर्यंतच्या संक्रमण काळात जीवनावर अमंगलतेची दाट छाया पसरल्याचा भास आपल्यापैकी प्रत्योकाला होणे स्वाभाविक आहे.’’ या कथासंग्रहात बुद्धाची गोष्ट अपघात, हिरण्यकेशी, कैदी, फत्तर, बाहुली भविष्य, सूर्यास्त, माणूस, ओलावा आणि मुरली अशा या कथा आहेत. अत्यंत दुर्मिळ अशा या कथा पुन्हा एकदा वाचकांना उपलब्ध झाल्या आहेत.