माझे शेल्फ
मयादा - इराकची कन्या
सद्दामच्या छळछावणीची कहाणी… मयादा अल-अस्करी, इराकची कन्या. मयादाचं घर हे एक प्रसिद्ध राजकीय घराणं होतं. मयादा ही एक लाडकी मुलगी आणि नात असल्याने तिच्या कुटुंबानं तिला शिक्षणाचा, विशेष आयुष्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. तिने वैद्यकीय शिक्षण घ्यावे किंा एखादी कला शिकावी, अशी तिच्याकडून अपेक्षा केली जात होती. परंतु इराकमधील राजकीय संघर्षांनी हे बेत उधळून लावले. १९६८मध्ये बाथ पक्ष सत्तेवर आल्यानंतर बहुतेक सर्व बुद्धिवादी शेजारच्या देशात पळून गेले. पण मयादाचे वडील कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी बगदादमध्येच राहण्याचं ठरवलं. सद्दाम हुसेनचे जुलूम वाढतच होते. मयादा इराकमध्येच लहानाची मोठी झाली होती. ती वृत्तपत्र वार्ताहाराचे काम करत होती. तिचा विवाहही इराकमध्येच झाला. तिची दोन्ही मुले अली व फे इराकमध्येच जन्मली. इराण-इराक युद्धानंतर खाडी युद्धातही ती इराकमध्ये टिकून राहिली. मयादाच्या वंशवृक्ष ओटोमन राजघराण्यापर्यंत जाऊन पोहोचलेला होता. तिचे दोन्हीकडचे आजोबा (वडिलांचे वडील जाफर पाशा अल अस्करी व आईचे वडिल साती अल हुसदी) या प्रचंड साम्राज्याचे प्रतिष्ठित नागरिक होते. सद्दामने इराकला एक मोठा तुरुंग बनवला होता. १९९९मध्ये मयादाला सद्दामच्या गुप्त पोलिसांनी सरकारविरोधी पत्रके छापण्याच्या आरोपाखाली अटक करून अत्यंत कुप्रसिद्ध अशा बलदियात तुरुंगामध्ये खेचत नेले, तेव्हा तिला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली. सद्दामच्या राजवाड्यात सन्मानानं जाणाऱ्या मयादाला त्याच्या छळछावणीत काही दिवस वाढावं लागलं. घटस्फोटीत, दोन मुलांची आई, लहानमोठी छपाईची कामे करून कसाबसा चरितार्थ चालवणारी मयादा हिला आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड वादळ येईल, अशी कल्पना नव्हती. आता तिला बलदियातमधील आधीचा सतरा ‘सावल्या स्त्रिया’ बंदियान असलेल्या एका दुर्गंधीमय कोठडीत जावे लागले. इराकमधील वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील या स्त्रियांच्या नशिबी खटल्याविनाच कैद, छळ आणि मृत्यूची भीती होती. वेळ काढण्यासाठी आधुनिक काळातील या शहजाद्या एकमेंकींना आपापल्या कहाण्या सांगत दिवस काढत होत्या. मयादाच्या खानदानाचा अभिमानस्पद इतिहास, दुसरा राजा पैâझलचा वध आणि त्यांच्या आजच्या छळाला कारणीभूत असलेल्या सद्दाम हुसेनशी मयादाच्या झालेल्या भेटी या तिच्या पूर्वायुष्यातील घटनांबद्दल तिच्या या सहकैदी स्त्रियांना कुतूहल वाटत असे. मयादावर राजद्रोहाचा आरोप होता. तिची आई सल्या अल हुसरी म्हणजे अरब राष्ट्रवादाचे जनक साती अल हुसरी तिचे वडील होते. तिच्या नावाचा वापर करूनही तुरुंगाधिकाऱ्यांनी तिला कोठडीत टाकले. तिथे शियापंथीय समारासह सतरा कैदी स्त्रिया होत्या. मयादाला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा तिला वारंवार विनवणी केल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आले.तेथे असणाऱ्या डॉक्टरवर विसंबून तिने तिच्या आईला तिच्याबद्दल कळवण्यास सांगितले. अंधाऱ्या खोलीत रात्र घालवल्यानंतर मयादाला इतर कैद्यांप्रमाणेच छळ करण्यासाठी बोलावणं झालं. त्या अनुभवानंतर ती गारठली. त्यानंतर सर्व कैदी स्त्रियांना ज्या छळाला सामोरे जावे लागले, ते पाहून मयादा वेडी व्हायला लागली, पण समारा व इतर स्त्रियांनी तिला सांभाळलं. मयादालाही छळ करण्यात येणाऱ्या खोलीत नेण्यात आले. तिला लाकडी खुर्चींत बांधून तिच्या सर्वांगात वीजप्रवाह सोडण्यात आला. त्यानंतर तिच्यावर खटला चालवण्यात येऊन तिची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यावर तिला कैद्येत असल्याचा समारा, आलिया, राशा, डॉ. सब्बाह, एमान, वकाल, मे, सारा, रौला, अमानी हयात आणि आशिया, मुना या साऱ्या कैद्याची घरी तिने फोन केले. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले व तिसऱ्या दिवश लाच देऊन तिचे इराकबाहेर पलायन केले. यासाठी तिला घटस्फोट दिलेल्या नवऱ्याशी पुन्हा विवाह करावा लागला. मुलगा अलीसह ती बाहेर पडली पण मुलगी फे हिला काही नेऊ शकली नाही. २०००मध्ये तिने फेलाही सोडवून नेले. २००१मध्ये अतिरेक्यांनी न्यूयॉर्क व वॉशिंग्टन डीसीवर हल्ले केले. त्याचवर्षी जॉर्ज बुश यांनी यांनी इराकमध्ये सैन्य पाठवले. २००३मध्ये बुश यांनी सद्दामला आघाडी सैन्याच्या सहाय्याने सत्तेवरून दूर केले. जीन सॅसनन यांनी सौदी अरेबियात १२ वर्षे नोकरी केली व सौदी स्त्रियांशी जवळीकचे नाते जुळवले. १९७८ मध्ये युनाटेड स्टेट ऑफ अमेरिका सोडून रियाधमधील रुग्णालयात त्यांनी मध्यपूर्वेत प्रवास केला. १९९१च्या आखाती युद्धानंतर मध्यपूर्व भाग, विशेषत: इराक क्षुब्ध बनला. सद्दामच्या बंधनात राहिलेल्या इराकी जनतेबद्दल वारणाचा कुतूहलबेरी त्यांनी १९९८च्या उन्हाळ्यामध्ये इराकला भेट दिली. ‘द रेप ऑफ कुवेत’ या पुस्तकातून त्यांनी सद्दामवर टीका करूनही सद्दामने तिला इराकमध्ये फिरण्याची परवानगी दिली. त्याच काळात मयादाची भेट झाली.