मुखपृष्ठ
नाते ब्रह्मांडाचे

माझे शेल्फ

नाते ब्रह्मांडाचे

इंग्रजी शीर्षक
Nate Brahmandache
सारांश

मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाचे आणि ताऱ्यांचे कायमच एक घट्ट नाते राहिले आहे. कधीकाळी आपल्या धार्मिक श्रद्धांवर, सत्तेच्या संरचनांवर, वैज्ञानिक प्रगतीवर आणि अगदी आपल्या जीवशास्त्रावर सुद्धा ताऱ्यांचा कितीतरी प्रभाव होता. पण मागील काही शतकांपासून आपल्या भोवतालच्या अवकाशापासून आपण स्वतःला दूर ठेवले आहे. आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे, लागणार आहे. हे पुस्तक म्हणजे एक इतिहासाची सफर आहे. इतिहास कशाचा? तर लासकॉक्स गुहेतील आदिमानवाने काढलेल्या बैलांच्या चित्रांपासून ते ताहितियन नावाडी ताऱ्यांचा दिशादर्शकासारखा उपयोग करून प्रवास करू लागले तिथे पर्यंत. मध्ययुगीन साधू काळाच्या प्रकृतीला आव्हान देऊ लागले तिथपासून ते अवकाश आणि वेळ एकच असल्याचा आईनंस्टाईनला शोध लागला तिथेपर्यंत सगळ्याचा सोप्या आणि रंजक भाषेत सांगितलेला हा इतिहास आहे. लेखक असे सुचवतो आहे की आपण ज्या अवकाशाचा भाग आहोत ते अवकाश, त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातील संभाव्य प्रेरणा आणि अविष्कार यांचा आपण नव्याने शोध घेतला पाहिजे.

शब्दांकन मूळ लेखकाने व अनुवादिका अंजनी नरवणे यांनी केले आहे. नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अनुवादही अत्यंत हृद्य व सरस झाला आहे. नारायण मूर्तींच्या व्यावसायिक विकासाचा आलेख दर्शविताना शब्दशैली जितकी सरळ, स्पष्ट आहे तितकीच कौटुंबिक प्रेमाभिव्यक्तीच्या प्रसंगी ती हळुवार व भावस्पर्शी होते. प्रसंगचित्रणात ती चित्रदर्शी बनते ज्यामुळे नारायण मूर्तींच्या जीवनातील प्रसंग जिवंत व उत्कट स्वरूपात वाचक मनाला भिडतात. विशेषत: आर्थिक परिस्थितीमुळे आय. आय. टी.चं स्वप्न दूर करून दूर दूर जाणाऱ्या ट्रेनकडे बघत मित्रांना निरोप देणारे मूर्ती हा प्रसंग तसेच सुधाताईच्या आई वडिलांना भेटून त्यांच्या व सुधाताईच्या विवाहासंदर्भात बोलणारे नारायण मूर्ती इ. प्रसंग लक्षणीय ठरतात. नारायण मूर्तींचा प्रामाणिकपणा, दृढ निश्चय, ठाम निर्णय, सत्याची कास धरणारा स्वभाव, अंतर्मुखता इ. अनेक पैलूंवर प्रकाश टाकताना लेखिकेच्या भाषेत कुठेही अभिनिवेश, आग्रहीपणा यांची छटाही नाही. संकोची, सर्वांना आदराने वागविणाऱ्या, चुकूनही कठोर शब्दांचा वापर न करणाऱ्या व लोकांना कामात तडजोड न करता विकासाच्या व परफेक्शनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नारायण मूर्तींच्या जीवनचरित्राचा अंजली नरवणे यांनी केलेला मराठी अनुवाद सहजसुंदर उतरला आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद