मुखपृष्ठ
नीलकंठ

माझे शेल्फ

नीलकंठ

इंग्रजी शीर्षक
Neelkanth
सारांश

स्री-पुरुष आणि नियती यांचे रंग दाखवणाऱ्या कथा... ‘नीलकंठ’ या पुस्तकामध्ये स्नेहल जोशी यांनी तब्बल १७ कथा लिहिल्या आहेत. ‘नीलकंठ’, ‘चैती’, ‘एक सशा’, ‘फ्रॉड’, ‘अॅना कॅरनिना’, ‘किस्मत’, ‘भूक’, ‘बहिणी’, ‘रान्देव्ह्यू’, ‘वादळ’, ‘जाऐ तो जाए कहाँ’, ‘मेड फर इच अदर’, ‘रखवाली’, ‘बळीचं तळ’, ‘एक बुचाचे झाड’, ‘शंखशिंपल्यांची बाहुली’, ‘इंद्रधनूच्या बेटावरील डोडो’ इत्यादी. ‘स्त्री-पुरुष नात्यातले काही न सांगितले गेलेले, न बोलले गेलेले पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न स्नेहल जोशी यांनी केला आहे. त्यांच्या सर्वच कथांच्या नायिका या कुठल्या अर्थी नियतीला शरण गेलेल्या आहेत. ‘नीलकंठ’, ‘चैती’, ‘जाऐ तो जाऐ कहाँ’, रान्देव्ह्यू’ या कथांमध्ये नात्यांतला एक वेगळा अनुबंध दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर ‘एक सशा’, ‘फ्रॉड’, ‘अॅना कॅरनिना’, ‘किस्मत’, ‘भूक’, ‘बहिणी’, ‘वादळ’, ‘मेड फॉर इच अदर’, ‘रखवाली’, ‘बळीचं तळं’, एक बुचाचे झाड’, ‘शंखशिंपल्यांची बाहुली’, ‘इंद्रधनूच्या बेटावरील डोडो’ या साऱ्या कथांमध्ये मनुष्यवासनेची वेगवेगळी रूपे आपल्याला हैराण करतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद