मुखपृष्ठ
नो कमबॅक्स

माझे शेल्फ

नो कमबॅक्स

इंग्रजी शीर्षक
No Come Backs
सारांश

वाचनीय रहस्यकथा… रहस्यकथांचं गमक हे त्यातलं रहस्य शेवटपर्यंत वाचकाला तर्क करायला लावणं आणि अखेरीस वेगळंच सत्य समोर आणण्यात येतं. प्रसिध्द लेखक फ्रेडी फोर्सिथ यांच्या नो कमबॅक्स या रहस्यकथा संग्रहात अशीच दहा सनसनाटी कथानकं मांडली आहेत.

मार्क सँडरसन : एक अतिशय श्रीमंत, लक्षाधीश उद्योगपती. पण एकाकीपणा हे त्याला सतत टोचणारं शल्य होतं. अशातच रूपसुंदर अँजेला समर्स त्याच्या आयुष्यात आली. पण... पण ती विवाहीत होती. हवी ती गोष्ट काहीही करून मिळवायचीच हा मार्कचा स्वभाव! आपल्या प्रियतमेच्या प्राप्तीसाठी तिच्या नव-याचा काटा काढायचा अत्यंत योजनाबद्ध कट त्यानं आखला... पण प्रत्यक्षात काय घडलं? सॅम्युएल नटकिन : एक सामान्य कारकून. बायकोच्या आजारपणामुळे शरीरसुखाला पारखा झालेला! ही भूक भागवण्याची एक अकल्पित संधी एक दिवस त्याच्यासमोर आली... पण क्षणिक विषयसुखाच्या मोहापायी तो महाबिलंदर ब्लॅकमेलर्सच्या जाळ्यात सापडला...! त्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली का? टिमोथी हॅन्सन : लंडनमधला एक धनाढ्य लक्षाधीश. असाध्य दुखणं जडल्यामुळे मृत्युपत्राद्वारे आपली अफाट संपत्ती त्यानं आपल्या एकमेव नावडत्या बहिणीच्या नावे केली... पण नंतर काय घडलं? हायजॅकर मर्फी : ब्रँडीच्या नऊ हजार बाटल्या चोरून हजारो पौंड्स कमावण्यासाठी हायजॅकर मर्फीनं एक अफलातून घाट घातला. त्यासाठी एक अख्खा जॅगरनॉट ट्रेलर त्यानं चक्क पळवून नेला...! त्याचा तो धाडसी बेत यशस्वी झाला का? हर्बर्ट र्लािकन : जुनं घर पाडून त्याच्या मोबदल्यात नवीन घर दिलं जात असतानाही हर्बर्ट र्लािकन आपलं घर सोडायला तयार नव्हता, म्हणून डब्लिन सिटी कौन्सिलनं या हट्टी म्हाता-याला बळजबरीनं त्याच्या घरातून बाहेर काढलं. त्याचं घर पाडण्यात आलं तेव्हा घरातल्या एका भिंतीमधून एका स्त्रीचा मृतदेह बाहेर पडला! कोण होती ती?... र्लािकनची बायको?... म्हणून तो आपलं जुनं घर सोडायला तयार नव्हता का? वेडी अभिलाषा, खून, फसवणूक, सूड, अलौकिक बुद्धिचातुर्य अशा विविध रहस्यांनी ओतप्रोत भरलेल्या सनसनाटी दहा रहस्यकथांचा जबरदस्त कथासंग्रह. नो कमबॅक्स स्टार्ट टू फिनिश – टोटल सस्पेन्स!

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद