माझे शेल्फ
नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी
नॉस्त्रादेमस हा जगातील महान भविष्यवेत्ता मानला जातो. त्याच्या सेंच्युरीज या पुस्तकाच्या अब्जावधी प्रती विकल्या गेल्या आहेत, अजुनही विकल्या जात आहेत! या पुस्तकात नॉस्त्रादेमसने बर्याच भविष्यवाण्या लिहून ठेवले्या आहेत, ज्यातील काही भविष्यवाण्या घडूनही गेल्या आहेत! पण या भविष्यवाण्या गद्यमय नसुन पद्यमय आहेत. ज्यामुळे त्यांचा अचुक अर्थ लावणे हे मोठे जिकीरीचे काम आहे. शिवाय काही अपवाद सोडला तर बाकीच्या ओळींमधे ज्यांच्याबद्दल भविष्यवाणी केलीये त्यांचं सरळ सरळ नाव न सांगता त्यांच्या उल्लेख समर्पक विशेषणाने करतो. उदा.- जर्मनला वुल्फ (लांडगा), भारताला समुद्राच्या नावाचा देश(सिंधु-हिंदु-हिंदुस्तान),चीनला ड्रॅगन इ. मानवी भविष्यवाणी गद्यमय असते व ईश्वरी भविष्यवाणी पद्यमय असे म्हटले जाते. स्वतः नॉस्त्रादेमस कबुल करतो की त्याने लिहिलेल्या सर्व भविष्यवाणी ईश्वराने(नियतीने) सांगितलेल्या आहेत. त्याने त्या तशाच शब्दात लिहिलेल्या आहेत. मायकेल नॉस्त्रादेमस हा चित्रपट बघावा तश्या भविष्यवाणी बघत असे. त्यासाठी त्याला काही ठराविक क्रियाकर्म करावे लागे. याबद्दल त्याने सेंच्युरीज या पुस्तकात सुरुवातीसच सर्वकाही सांगितले आहे. त्याच्या काळात त्याने केलेल्या काही कटू भविष्यवाणींमुळे व त्या लोकांना प्रत्ययास आल्यामुळे त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. लोक त्याच्यावर संशय घ्यायचे की नॉस्त्रादेमस काहीतरी काळी जादू करुन तोच हे सर्व घडवित आहे. परंतु इंग्लडच्या राणीने त्याला संरक्षण दिल्यामुळे त्याला कुणीच हातही लावु शकत नव्हता(या राणीने नॉस्त्रादेमसनी सेंच्युरीज या पुस्तकात वर्तवलेली स्वतःच्या पतीच्या मृत्युची भविष्यवाणी वाचली होती. तिने त्याबद्दल राजालाही सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण राजाने ही गोष्ट हसण्यावारी नेली. परिणामी पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत तसाच राजाचा मृत्यु झाला.) नेपोलियन बोनापार्ट आणि अडॉल्फ हिटलर यांच्याबद्दलतर त्यानी सर्वकाही चारशेवर्षापूर्वीच लिहून ठेवलंय. अगदी त्यांच्या जन्मापासुन तर ते मृत्युपर्यंत आणि ते ही त्यांच्या नावासकट! त्यांचा जन्म होण्याआधीच! हिटलरला त्याचा मृत्यु कसा होणार हे आधीच या पुस्तकामुळे कळले होते. पण नियती अटळ असते, त्याप्रमाणेच झालं. भारताबद्दलही नॉस्त्रादेमसनी काही भविष्यवाणी लिहिल्यात. पैकी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या मृत्युची भविष्यवाणी प्रत्ययास आलीये. अजुनएक भविष्यवाणी म्हणजे भारतात पाच नद्या असलेल्या राज्यात जन्माला येणारा महामानव! हा मानव भारताचा सर्वेसर्वा होईल आणि याच मानवामुळे तिसरे विश्व महायुद्ध समाप्त होईल! ह्याच्यामुळेच भारत जगात महासत्ता होईल आणि दहशतवाद समाप्त होईल! याच्यामुळेच जगात शांतता स्थापित होईल व जग या महामानवाच्या वक्तृत्वाचा दिवाना होईल! तिसर्या महायुद्धाच्याच बहुतेक भविष्यवाण्या नॉस्त्रादेमसच्या सेंच्युरीज या पुस्तकात आहेत. तिसरे महायुद्ध हे अघोषित महायुद्ध असेल! म्हणजे तिसरे महायुद्ध सुरु झालंय याचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती निर्माण होईल! जगाचं खुप नुकसान होईल. पण जेव्हा हे महायुद्ध संपेल, तेव्हा जगातुन दहशतवादही संपेल! नॉस्त्रादेमसच्या मते जगातील चौथे आणि शेवटचे महायुद्ध हे तिसर्या महायुद्धानंतर कित्येक शतकानंतर, हजारो वर्षानंतर होईल! या महायुद्धामुळे पृथ्वी मानवांस राहण्यायोग्य असणार नाही. महायुद्ध संपल्यानंतरही सगळीकडे मृत्युचे थैमान असेल, रोगराई असेल! या महायुद्धामुळेच मानवाचा आणि पर्यायाने सर्व सजीवसृष्टीचा ऱ्हास्य होईल! वेल, या सर्व गोष्टींना अजुन अवकाश आहे. मायकेल नॉस्त्रादेमस या सर्वोत्तम भविष्यवेत्ता आणि महान द्रष्टाबद्दल असेच काही अजुन माहिती, किस्से नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी या मराठी पुस्तकात वाचायला मिळेल. स्वतःचा मृत्यु केव्हा असेल व मृत्युनंतर पंचवीस- पन्नास वर्षानंतर त्याच्या प्रेतासोबत काय होईल याची आधीच जाणीव असलेला व आपल्या या भविष्यवाणींचा कुणी दुष्ट हेतूने वापर करु नये म्हणुन खबरदारी घेणारा मायकेल नॉस्त्रादेमस हे अजब रसायन एकदा अनुभवून पहाच.