माझे शेल्फ
नॉट विदाउट माय डॉटर
अंगावर शहारे आणणारी एका धाडशी आईची साहसी गोष्ट ती नऊवारीतील माय असो की सहावारीतील आई असो किंवा जीन्समधील मॉम असो ,ती देशी असो वा विदेशी असो किंवा ती पौर्वात्य असो की पाश्चिमात्त्य असो.जगाच्या पाठीवरील स्त्री कुठलीही असो तिचे मातृत्व हे एकजिनशीच असते.आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी ती लढत असते,झगडत असते व जीव पणाला लावत असते.अशाच एका धाडशी आईची गोष्ट वाचण्यात आली आणि एखाद्या चित्रपटाप्रमाणे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहत होते इतके बोलके व जीवंत वर्णन खूपच ताकदीने या प्रतिभावान आईने केले आहे. नॉट विदाऊट माय डॉटर अंगावर शहारे आणणारे व हातून न सुटणारे हे पुस्तक .प्रत्येक मुलीच्या आईने,आईच्या मुलीने व तसे तर प्रत्येकांनीच वाचावे इतके वाचनीय आहे. सत्य घटनेवरील ही कादंबरी ..बेस्ट सेलर आणि पुलित्झर पुरस्कारासाठी नामांकन झालेली ही कादंबरी ..एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील इराण मधील भयंकर वास्तव महिलेच्या जगण्याकडे आणि जाचाकडे नेऊन पोहचवते. स्त्री ही माणूस असते....या सत्यापासून कोसो दूर असणारा इराण देश.फारशी संस्कृतीचा प्रचंड अभिमान बाळगणारा हा देश ..पण या महान संस्कृतीच्या कुठल्याच खाणाखूणा आता इराण देशात कुठेच दिसत नाहीत. प्रचंड मागासलेला,कर्मकांडी,कट्टर ,अंधानूकरणीय ,अजागळ व अशांत असा सतत युद्धाच्या तयारीत धुमसत असलेला हा देश.. बेट्टी महमूदी ही अमेरिकेची उच्चशिक्षीत महिला. इराणी डॉक्टर मुडी महमूदीसोबत विवाह करून अमेरिकतच स्थायिक होत आपल्या पूर्वाश्रमीची दोन मुले व मुलगी माहतोब सोबत सुखी जीवन जगणारी , आत्मभान असणारी, स्वाभिमानी व संवेदनाशील अशी स्त्री . इराणमधील सत्तापरिवर्तन व क्रांतीकारी विचार डॉ.मुडीला मायदेशी परतून परिवारासोबत राहण्यासाठी वारंवार खुणावतात तर बेट्टीला आपला शांतताप्रिय देश ,आपली मुले व नातेवाईक सोडून इराणसारख्या अशांत देशात स्थायिक होणे कदापिही मान्य नसते. पण पतीच्या आग्रहाने शेवटी दोन आठवड्याच्या सुट्टीसाठी म्हणून बेट्टीला आपल्या पाच वर्षाच्या माहतोब मुलीला घेऊन पतीसोबत इराणला जावे लागते. इराणमध्ये पाऊल ठेवल्यापासून बेट्टीला तिथल्या अनेक जाचक रूढीपरंपरेला पदोपदी तोंड द्यावे लागते.बुरखा पद्धती काटेकोरपणे पाळणारे इथले कायदे,प्रशासन ,नागरिक व अगदीच स्त्रियांसुद्धा ...रस्त्यावर चालणाऱ्या स्त्रियांचे नख व केसही नजरेस पडू नये यासाठी जागोजागी महिला सोल्जर्स गस्त घालतात व कधीही या नियमांचे उल्लंघन केले म्हणून तुरुंगात डांबतात.बेट्टी ...ही तर मानवी स्वातंत्र्याचा उद् घोष करणाऱ्या अमेरिकेसारख्या पुरोगामी राष्ट्रात जन्मलेली शिवाय ती अमेरिकन ..शत्रूराष्ट्राची म्हणून इराणींच्या प्रचंड द्वेशाला तिला सामोरे जावे लागते.महिन्नोमहिने स्नान न करणाऱ्या मुडीच्या नातेवाईकासोबत राहणे,खाणे व मिसळणे तिला जीवघेणे बनते.धान्य स्वच्छ करून वापरावे ,स्वयंपाक घराची दररोज स्वच्छता करावी, जेवताना मुठीने खात आरडाओरडा न करता चमचा हाताने शांततेत जेवावे ....हे त्यांच्या ध्यानीमनी ही नव्हते. या बेशिस्त जगणाऱ्या लोकांचा तिला उबग यायला लागतो . पण सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे ज्याच्या भरवशावर ती आपला मायदेश, आपली माणसे सोडून आली होती ,तो तिचा उच्चशिक्षित डॉक्टर पती मात्र कमालीचा बदलतो .तापट ,संतापी,क्रूर,आळशी,नाकर्ता,कट्टर व संकुचित बनतो.बेट्टीचे पासपोर्ट ,क्रेडिट कार्ड,पासबुक व रोख पैसे काढून घेऊन तिच्या मायदेशी परतण्याच्या सर्वच वाटा बंद करत तिला नजरकैदेत टाकतो .मुडी बेट्टीचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करतो तेव्हा तो आपल्या पाच वर्षांच्या मुलींलाही मारहाण करतो . या सगळ्या दुष्टचक्रात बेट्टी व माहतोब पूर्ण अडकतात त्यांची सुटका होणे अशक्यच असते पण तिचे आईवडील अमेरिकेतून पूर्ण प्रयत्न करतात.इराणमध्ये सगळेच क्रूर नव्हते .काही चांगली माणसे ,मित्र व मैत्रिणी तिला भेटतात.रात्र-दिवस युद्धमय स्थितीत असणाऱ्या या असुरक्षित देशात तिने व तिच्या मुलींने संपूर्ण जीवन कुढत , लाचारीत व परकीय संस्कृतीच्या कचाट्यात एका जुलमी व क्रूर माणसाच्या हातचे बाहूले बनून जगावे ,हे तिला कदापिही मान्य नसते. इच्छा तेथे मार्ग .. या तिच्या वडिलांच्या प्रेरक पाठिंब्यातून तिने आपल्या मुलीसह सुटकेचे सर्व वैध व अवैध मार्ग धुंडाळत राहते.वैध मार्गाने गेले तर या जाचातून तिची एकटीची घटस्फोट देऊन सुटका होणार असते पण स्त्री विरोधी जाचक इराणी कायद्यानुसार मुलींचा ताबा तिच्या क्रूर व तापट पतीकडे जाणार होता ...जे तिला स्वप्नातही मान्य नव्हते.यासाठी तिने अवैध मार्गाने म्हणजे तुर्कस्थान मार्गे टोळीवाले स्मगलरच्या माध्यमातून डोंगरी सरहद् पार करून अतिशय धोकादायक मार्गाने प्रवास करण्याचे धाडस करते.खरे तर असा प्रवास आतापर्यंत कुठल्याच स्त्रीने एकटीने ते ही लहान मुलीला घेऊन कलेलं नव्हतं...मायदेश गाठण्याची तिच्या प्रयत्नांची सुरूवात