मुखपृष्ठ
नथिंग व्हेंचर्ड

माझे शेल्फ

नथिंग व्हेंचर्ड

इंग्रजी शीर्षक
Nothing Ventured
सारांश

जेफ्री आर्चर यांच्या नव्या संडे टाईम्स बेस्ट सेलर्स मालिकेची सुरुवात नथिंग व्हेंचर्ड या पुस्तकाने होत आहे. पोलिसात भरती झाल्यानंतर विल्यम नवोदित तपास अधिकारी म्हणून स्कॉटलंड यार्डच्या कला आणि प्राचीन कलावस्तू दलात सामील होतो. इथे प्रथमच तो एका मोठ्या प्रकरणाची उकल करतो. फिट्झमोलियन म्यूझिअममधील रेंब्रांच्या एका अमूल्य चित्राच्या चोरीचा तपास तो करत असतो. याच काळात बेथ रेन्सफोर्ड या तिथल्या संशोधन साहाय्यकेशी त्याची भेट होते. तो तिच्या प्रेमात पडतो. बेथकडेही एक गुपित असतं. हरवलेल्या चित्राचा मागोवा घेताना विल्यमची गाठ माइल्स फॉकनर या संभावित चित्रसंग्राहकाशी आणि त्याचा चलाख वकील बूथ वॉट्सन (क्यूसी) यांच्याशी पडते. विल्यमच्या एक पाऊल पुढे राहाण्यासाठी ते दोघे कायदा अगदी मोडेल इतका ताणण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे माइल्स फॉकनरची पत्नी ख्रिस्टिना मात्र विल्यमशी मैत्री करते; पण ती नक्की कुणाच्या बाजूने असते? विल्यम वॉरिक या कुटुंबवत्सल आणि करामती तपास अधिकाऱ्याच्या जीवनाची ही कथा आहे. विल्यम आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शक्तिमान गुन्हेगारी शत्रूंशी चतुरपणे आणि हिकमतीने लढतो.

जणू एखाद्या दुःस्वप्नासारखी कादंबरीभर जाणवत राहते. या सगळ्या प्रवासात सगळेच अनुभव व माणसे कटू नव्हती काही खूपच चांगल्या माणसांनी तिची मदत केली.कधी मोटार,कधी ट्रक ,कधी बर्फाच्छादित ठिकाणी पायी तर शेवटी बर्फाच्या त्या सरहद्दीच्या डोंगराळ भागात घोड्यावरून असा तब्बल आठ दिवस संकटमय व भीतिप्रद प्रवास करून इराणमधून पळ काढून ती तुर्कस्थानात पोहचते व तिथून अमेरिकेच्या मदतीने ती घरी सुरक्षित आपल्या मुलीसह पोहचते. इच्छा तिथे मार्ग...हा बेट्टी च्या वडिलांचा सल्ला..बेट्टीना..,प्रचंड ञासातुन पण सतत प्रेरक ठरवत...निश्चयी आणि ठाम बनवत गेला...खोटं बोलून..फसवणुक करून.,इराण मध्ये आणल्या गेलेल्या बेट्टी आणि त्यांची पाच वर्ष वयाची मुलगी माहतोब ...यांच्यासोबतची ..संकटाची..छळाची..फसवणुकीची आणि हीनतेची ही कादंबरी...अंगावर शहारे देत ...जात..धर्म..देश..सर्व सोडून...सुन्न करते... आणि माणुसकीला आवाहन देते ..! आपण सर्वांनी ही एका धाडशी मातेची साहसी गोष्ट आवर्जून वाचावीच. स्ञी शक्तीला व मातृशक्तीला सलाम. सत्य मेव जयते ! नक्की वाचा....नाॅट विदाऊट माय डाॅटर .

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद