मुखपृष्ठ
ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स

माझे शेल्फ

ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स

इंग्रजी शीर्षक
On The Wings Of Eagles
सारांश

मूळ लेखक,केन फोलेट, अनुवाद जोत्स्ना लेले.मेहता पब्लिशिंग चे हे पुस्तक, हे कथानक इराणमध्ये घडतं.इराणमध्ये इलेक्ट्रॉनिक डाटा सिस्टीम कॉर्पोरेशन(इ.डा.सि.) या अमेरिकन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना विनाकारण, विनाचौकशी तुरुंगात डांबले. जामीन ठोठावला. प्रचंड १३,०००,००० अमेरिकन डॉलर! ही वार्ता अमेरिकेत वणव्यासारखी पसरली. रॉस पेरो ह्या कंपनीच्या मालकाची, तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. क्रांतीच्या अंदाधुंद वातावरणात सर्व सनदशीर मार्ग ठप्प झाले होते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तळमळत असणाऱ्या ह्या आगळ्या वेगळ्या धन्यासमोर आता एकच धोकादायक मार्ग होता.इराणच्या अभेद्य तुरुंगाला भगदाड पाडणे ऑपरेशन हॉट फूट ह्या धाडसी योजनेचा सूत्रधार होता निर्भेद, निवृत्त आर्मी कर्नलबुल सायमन योजना असफल झाल्यास दोनजणांऐवजी अनेकांना प्राण गमवावे लागणार! आणि वर अपरिमित नुकसान व मानहानी! सायमनने इ.डा.सि.च्याच अकरा कर्तबगार अधिकाऱ्यांना हाताशी धरले. ही योजना कशी आखली? अल्पशा काळांत सर्वांना प्रशिक्षण कसे दिले? तुरुंग फोडला का? ही चित्तथरारक, परमशौर्याची सत्यकथा आपल्यासमोर उलगडत जाते व उत्कंठा शिगेला पोहोचते. सुटका पथकाच्या बारा जणांनी घेतलेली ही जबरदस्त गरुडझेप.नक्कीच हातातून सुटणार नाही असे पुस्तकं.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद