माझे शेल्फ
पिढी दर पिढी
ही कादंबरी वांग युआन या तरुणाच्या जीवनाभोवती फिरते. त्याचे वडील टायगर वांग सरदार असतात. सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत राहून शिकणारा युआन अचानक घरी येतो; कारण क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये जाऊन स्वतःच्या वडिलांविरुद्ध त्याला लढायचं नसतं. त्यानंतर आजोबांच्या जुन्या मातीच्या घरात रमलेल्या युआनला टायगर पुन्हा घरी बोलावतो, तेव्हा युआन रागानं घराबाहेर पडतो आणि आपल्या सावत्र आईकडे जातो. तिथे त्याला आय-लान ही बहीण, तसेच जमीनदार वांग आणि व्यापारी वांग हे दोन थोरले काका आणि त्यांची बायका-मुलं असा गोतावळा भेटतो. शिक्षणासाठी युआन परदेशी जातो. मोठ्या विद्यापीठात शेतकी शास्त्राचं शिक्षण घेऊन सहा वर्षांनंतर मायदेशी परत येतो. आईने आश्रमातून सांभाळायला आणलेली, डॉक्टर होऊ इच्छिणारी मी-लिंग युआनला आवडते. मात्र, तिला प्रथम शिक्षण पूर्ण करायचे असते. युआनही वडिलांचे कर्ज फेडणे आपले कर्तव्य आहे असे मानून नोकरी करू लागतो. वास्तवता-भावपूर्णतेचा अनोखा संगम.