माझे शेल्फ
प्लान टार्गेट क्लेम
व्हिएतनाममधील विमान-प्रवासापासून सुरुवात होते आणि वाचक त्याबरोबर ठिकठिकाणी फिरत राहतो– कथेत गुंतत जातो.विमा, जाहिरात, विक्री आदि क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा आणि ‘उद्दिष्टे’ असतात. त्यात एकदा प्रवेश केला आणि टिकायचे असेल, तर त्यातून सुटका नाही. ‘प्लॅन टार्गेट’मध्ये त्याचे उत्तम दर्शन घडले आहे. पैसा ‘पेरणे’ आणि ‘स्त्री- सौंदर्या’चा वापर, हे अशा कोणत्याही व्यवसायाचे सूत्र आहे. ते गैर-अनैतिक आहे ही भावनाच वरिष्ठांच्या किंवा कनिष्ठांच्या मनात नसते.
कादंबरीलेखनाची एक आगळी-वेगळी पद्धत येथे लेखकाने हाताळली आहे. याला Short But Sweet असे म्हणावे लागेल. छोट्या-छोट्या प्रकरणांतून विषय पुढे नेण्याच्या हातोटीमुळे रहस्याची पकड कायम राहण्यास मदत झाली आहे. उत्कंठा, वेग, रहस्य, गुन्हेगारी, नेमकेपणा इ. इ. कथानकात आहेतच. कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी इथे एक प्लॅन आहे. काय असेल बरं तो प्लॅन? वाचकांनी पुस्तक वाचायला हातात घेतल्यावरच याचा आनंद घेता येईल.