मुखपृष्ठ
अ प्रिझनर ऑफ बर्थ

माझे शेल्फ

अ प्रिझनर ऑफ बर्थ

इंग्रजी शीर्षक
A Prisoner Of Birth
सारांश

घनिष्ठ मैत्री, पराकोटीचे शत्रुत्व, निर्व्याजप्रेम अशा भावनांनी भरलेली ही कादंबरी वाचकाला आपलेसे करून घेते. कथा युरोपातील इंग्लंड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड या देशांत घडते. अतिशय वेगवान घडामोडींनी कथानकातील थरार कायम ठेवत कथानक पुढे जाते. __"ज्यांची नियत साफ असते, त्यांचा पराभव कधीही होत नाही !" - आयुष्यात अनुभवांस आलेले प्रसंग, प्रत्यक्ष पाहिलेल्या घटना आणि आजवर केलेल्या वाचनातून मिळालेले बोध ह्या निकषांच्या आधारांवर हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता; आणि या विश्वासाला अधिक दृ व बळकट करण्याचं कार्य प्रख्यात लेखक जेफ्री आर्चरद्वारा लिखित, A Prisoner Of Birth ! या कादंबरीने केलं. "माणूस स्वतःशी प्रामाणिक असला, इतरांचं जाणणारा असला, आलेल्या संकटांना न घाबरता धैर्याने सामोरा जाणारा असला आणि जिद्द, चिकाटी, संयम व शिस्त यांना अंगी बाळगणारा गुणवंत असला की, नियती सुद्धा एखाद्या निष्ठावान प्रेमिकेसारखी त्याची साथ देते." हा बोध आपल्या सर्वांच्या मनामनांवर बिंबवणारी ही प्रतिशोधकथा ! ही कहाणी आहे, लंडनमधील ईस्ट-एंड भागांत राहणाऱ्या डॅनिअल कार्टराईट उर्फ डॅनी नामक एका बॉक्सर तरुणाची ! चरितार्थासाठी तो एका गॅरेजवर मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. त्या गॅरेजचे मालक मि.जॉर्ज विल्सन यांची मुलगी एलिझाबेथ हिच्यावर डॅनीचं प्रेम होतं. १८ सप्टेंबर, १९९९ रोजी संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये डॅनीने गुडघ्यांवर खाली बसत बेथला लग्नाची मागणी घातली. या मागणीला बेथने होकारही दिला. त्या रात्री लग्नाची एंगेजमेंट साजरी करण्यासाठी डॅनी, बेथ व बेथचा भाऊ बर्नार्ड विल्सन उर्फ बर्नी हे तिघे एका बार मध्ये जमले. त्या तिघांची लहानपणापासून मैत्री होती. बारमधील एका टेबलाभोवती बसून हे तिघे मित्र आनंद साजरा करत असतांना, तिथे आलेल्या चार जणांच्या टोळक्यातील दोघांनी बेथची छेड काढत तिला शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेला बर्नी व त्या चौघांमध्ये बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर मारामारीत होऊन त्या चौघांमधील एकाने बर्नीच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केला. टोळीतील संबंधित चौघांनी कोर्टासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, समाजातील आपल्या प्रतिष्ठेचा वापर करत एक योजना आखली व या खुनाचा आरोप टाकला मृत बर्नीचा मित्र, बेथचा प्रियकर आणि या कादंबरीचा नायक असलेल्या निरपराध डॅनिअल कार्टराईट वर ! कोर्टाने डॅनीला दोषी ठरवत २२ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. व न्यायालयीन कोठडीमधून त्याची रवानगी ज्या कारागृहात झाली, त्याचं नाव होतं, बेलमार्श प्रिझन ! अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी ओळखला जाणारा हा तुरुंग ! कोणताही कैदी या तुरूंगातून निसटून जाऊ शकला नव्हता. अशा या तुरूंगातून अत्यंत आश्चर्यकारकपणे बाहेर येऊन खऱ्या गुन्हेगारांना धडा शिकवणाऱ्या डॅनिअल कार्टराईटची ही प्रतिशोधकथा ! शिर्षकाप्रमाणेच ही कथा अन्याय, कारावास, षडयंत्र व प्रतिशोध यांच्या वलयामध्ये साकारलेली असली तरी, या कथानकात एक प्रकारची Positivity आहे. "आजही या जगात तत्वनिष्ठ, संवेदनशील व सत्यप्रिय लोक अस्तित्वात आहेत" यावर आपला विश्वास दृढ करणारी ही कथा आहे. ● डॅनीची ही कथा आपल्याला कोणकोणते बोध देते ? • We All Suffer In Our Own Different Ways From Being Prisoners Of Birth ! • या पृथ्वीवर जन्मास येणारा प्रत्येकजण त्याच्यासोबत त्याची सुखदुःख व संकटांना सोबत घेऊनच जन्माला येत असतो. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. • अडचणींच्या वेळी पूर्वायुष्यातील आपला प्रामाणिकपणा व सद्य परिस्थितीविषयी आशावादी दृष्टिकोन या दोनच गोष्टी आपली साथ देतात. • आपल्या प्रत्येकाच्या जन्मामागे एक दैवी हेतू असतो, एकदा तो आपल्या लक्षात आला की, जीवन व मृत्यू या अवस्था आपल्याला कधीही शिक्षेप्रमाणे भासत नाहीत. • माणसाने भावनांच्या भरात आपल्या हातून कोणतेही अपकृत्य घडणार नाही याची काळजी सतत घ्यायला हवी. तसेच राग व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीमध्येही एक प्रकारचा संयम व शांतता असायला हवी.रागाच्या भरातील आपले कोणतेही कृत्य डॅनी कार्टराईट प्रमाणे आपल्याला केव्हा आणि कसे गोत्यात आणू शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. • जे लोक खोटं बोलतात, ते नेहमीच काहीतरी चूक नक्की करतात. त्यांची ही चूक त्यांना प्रगतीपथावर कधीही पुढे जाऊ देत नाही. असे लोक व त्यांच्या खोटेपणाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर आल्यास, तिथे वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नियती अशा लोकांचा अगदी योग्य वेळेवर न्याय करते. • कितीही वाईट वेळ आली तरी आपल्यासाठी अज्ञात असलेल्या गोष्टींचे शिक्षण घेण्यात, चांगल्या सवयी अंगिकारण्यात आपण कधीही काचकूच करता कामा नये. अशा वेळी आपण दर्शविलेली तयारी पुढे आपला मार्ग अधिक सोयीचा करत असते.

तुकाराम ओंबळेंनी कसाब हालचाल करतोय हे बघून त्याला मिठी मारली. कसाबने गोळ्या झाडल्या. इतरांनी कसाबला धरून ठेवले. कसाब जिवंत हाती लागला. सलाम...मुंबई (बाची करकेरिया), भयानक वास्तव (ज्युलिओ रिबेरो), दहशतवादाचे उगम स्थान (हरिंहर बावेजा) वगैरे लेखही मुंबईच्या नागरिकांच्या मनोधैर्यावर प्रकाश टाकतात. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही लक्षात आणून देतात. मुंबई हल्ल्यावरच्या या पुस्तकाने अतिरेक्यांच्या कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची सिद्धता आणखी कडक हवी हे लक्षात येते. संबंधित यंत्रणांनी त्याबाबत आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करायला हवी.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद