मुखपृष्ठ
प्रस्थान

माझे शेल्फ

प्रस्थान

इंग्रजी शीर्षक
Prasthan
सारांश

अंतःकरणाचा ठाव घेणारी कादंबरी… रेखा बैजल यांची ओळख कादंबरी, कथा, कथाकथन, चित्रपटांच्या लेखिका तसेच कवयित्री म्हणून मराठी वाचकाला आहे. प्रस्थान ही त्यांची नवी कादंबरी. गेल्या दहा वर्षात झालेले सामाजिक बदल, त्यात गुंतून गेलेली तरुण पिढी अनेक सुविधा असानाही मनात असणारी अस्वस्थता एकीकडे चंगळवादी मनोवृत्ती तर दुसरीकडे वेळ मिळत नसल्यामुळे होणारी भावनिक कोंडी या आणि अशा अनेक प्रश्नांसमोर तरुणपिढी हतबल होऊन उभी राहत आहे. विभक्त कुटुंबामुळे सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिक, भावनिक दबावाचा निचरा होण्याचे साधन संपुष्टात आले आहे. अशा परिस्थितीत भावनाशून्यता निर्माण होत होत ही पिढी केवळ भौतिकवादी होते आणि सहनशक्ती संपलेल्या या व्यक्ती आयुष्यात घटस्फोटासारख्या दुर्दैवाला सामोरी जावी लागते. काँटॅक्ट मॅरेज, वन पॅरेंटल सिस्टिम, क्रेश, वृद्धाश्रम हे कुटुंबव्यवस्थेत शिरलेले व्हायरस असून कुटुंबव्यवस्था यामुळे संपुष्टात येते. या सगळ्या परिस्थितीत एखादी भावनिकदृष्ट्या तरल असणारी तसेच मानसिक गरजांची ओढ अधिक असणारी व्यक्ती सापडली तर तिची अवस्था कशी होईल याचे चित्रण प्रस्थान या कादंबरीत केले आहे. एकादृष्टीने असफल असली तरी सफल प्रेमाची ही प्रेमकथा आहे. यातील व्यक्तिरेखा ठळकपणे वाचकांसमोर येत जातात. प्रणव, मेघना, रोहन, वर्षा, मार्था यांच्या जीवनप्रवासाची एकाच वेळी सुस्थिरता आणि भावनिक पातळीवरची भयानकता स्पष्ट करत जातात. कादंबरीचे सार सांगताना मनातल्या घोंगावणाऱ्या वादळाला त्याचबरोबर अचल असणाऱ्या हिमालयाच्या शिखराला आपण कसे स्थान देतो यावरून व्यक्तीची ओळख घडते. सुख-दुःखं अशाच प्रकारे जीवनात चालून येत असतात. समुद्रात जहाज जेव्हा भरकटते तेव्हा कॅप्टन गोंधळतो. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत त्याला आय ऑफ स्टॉर्म दाखवला जातो. हा वादळाचा केंद्रबिंदू त्याला दिसल्यावर एक गोष्ट लक्षात येते. त्या मध्यबिंदूत आश्चर्यकारक शांतता असते आणि तिथे जहाज नेले की ते सुरक्षित राहणार असते. असाच मनाचा एक कोपरा आपण निर्माण केला की, आयुष्यात कितीही वादळे आली तरी त्या कोपऱ्याचा आश्रय घेतला की, आपण ती वादळं समर्थपणे परतून लावू शकतो. परंतु, हा कोपरा प्रयत्नपूर्वक निर्माण करावा लागतो. रेख बैजल यांनी प्रस्थानमधून हा कोपरा अत्यंत नेटक्या स्वरूपात उभा केला असून जीवनाचे प्रतिबिंब त्यात पाहावे असेच आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या कादंबरीस चंद्रमोहन कुलकर्णी यांचे तेवढेच समर्पक मुखपृष्ठ लाभले आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद