माझे शेल्फ
प्रतीक्षा
कथेचा विषय असा... कादंबरीचा नायक मिलिंद अतृप्त आणि असफल प्रेमजीवनातून आलेल्या निराशेपोटी भटकत असतो. खऱ्या प्रेमाच्या शोधत तो फिरत फिरत हिमालयातील एका मठात येतो. आणि तेथेच त्याची नंदिनी ह्या नायिकेशी गाठ पडते. मिलिंद अतिशय हलक्या व भावपूर्ण अंतःकरणचा आहे. तर नंदिनी सुंदर, सत्वशील, प्रेमळ, संयमी, कर्तव्यदक्ष आणि विचारी आहे. अतिशय अलगदपणे त्या दोघांनमधील भावबंध विणले जातात. ती हळूहळू घट्ट होणारी वीण वाचकाला मंत्रमुग्ध करते. तिसरी व्यक्तिरेखा ह्या कादंबरीतील बाबा (मठातील अध्यात्मिक गुरू) ही आहे. बाबाच्या व्यक्तीरेखेतून पाप, पुण्य, प्रेम जीवन परमेश्वर इत्यादी विषयांची वेगळी पण ठाम मते वाचकांसमोर येतात. कादंबरीतील वातावरण निर्मिती ही लक्षणीय आहे. कादंबरी वाचताना आपण देखील हिमालयात वावरत आहोत असा भास होतो. निसर्गवर्णनाबरोबरच लोकजीवनाचेही चित्रण येथे आढळते. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारचे रहस्यपुर्ण कथानक रंगवून लेखकाने ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या मनाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे.