माझे शेल्फ
प्रयोग वनस्पती विज्ञानाचे
विज्ञानातल्या वेगवेगळ्या प्रयोगांबाबत डी. एस. इटोकर यांनी लिहिलेली ही पुस्तकं. विज्ञानाची तत्त्वं अतिशय छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे त्यांनी समजावून दिली आहेत. काही प्रयोग तर अगदी घरात नेहमी सापडणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येतील. ‘प्रयोग वनस्पती वि्ञानाचे’ या पुस्तकात इटोकर यांनी वनस्पतींची मुळं, खोड, पानं अशा सर्व अवयावांशी संबंधित किंवा अनुषंगिक गोष्टींशी संबंधित प्रयोग दिले आहेत. पानाला असणारी छिद्रं, पाण्याकडं वळणारी बियांची मुळं, पानांचं ऑक्सिजन सोडणं अशा अनेक गोष्टी या प्रयोगातून माहीत करून घेता येतील. ‘विज्ञानातील रंजकता’ या पुस्तकात दृष्टीसातत्य, पृष्ठताण, गुरुत्वमध्य आदी तत्त्वांबाबतच्या प्रयोगांचा समावेश आहे. डोलणारा पक्षी, बाटलीतील पाणचक्की, वर चढणारा संकू, लाकडी नाव, हालचाल करणारं चित्र, चिकटणारं वर्तृळ, उडणारं बूच अशा अनेक गमतीदार वस्तूही तयार करून त्यांद्वारे विज्ञान शिकण्याची सुविधा या पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आली आहे.