मुखपृष्ठ
पृथ्वीवर माणूस उपराच!

माझे शेल्फ

पृथ्वीवर माणूस उपराच!

इंग्रजी शीर्षक
Pruthvivar Manus Uprach!
सारांश

पृथ्वीवर माणूस उपराच........ मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध. या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव शोून काढत आहे; परंतू तरीही अजून सृष्टीची अनेक गुपितं मानवाला माहित झालेली नाहीत. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत. मानवी इतिहासाचा शोध घेता घेता अशा एका बिंदूपाशी आपण थबकतो की ह्यापूर्वीचे काही संदर्भ सापडणे कठीण होते. या विषयासंबंधी एरिक व्हॉन डॅनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने काही धक्कादायक सिद्धांत मांडले. देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत. या सिद्धांताची मनोरंजक माहिती या पुस्तकात दिली आहे. विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक पुस्तक. ईजिप्तमधले पिरॅमिडस, त्यांची शास्त्रीय रचना,पायाची अशी बांधणी की ज्यामुळे पृथ्वीवरील जमिन आणि पाणी यांची समान भागणी व्हावी,त्यांचा पाय या गणितातील सर्वात स्थिर संख्येशी असलेला संबंध, पिरॅमिडच्या आतुन वर पाहीले तर एखाद्या नक्षत्रावर अथवा तार्यावर केंद्रीत होणे,पिरॅमिडमधुन किरणोत्सर्ग बाहेर पडणे......ई. ऍडमिरल पिरी रीस याने तयार केलेला जगाचा नकाशा. त्यात आत्ता आत्ता ज्याचा आकार नीट कळला आहे अशा अंटार्क्टीका चा आकार अगदी तंतोतंत आहे. खुप उंचीवर गेल्याखेरीज हे जमणार नाही. चाकाचा शोध लागला नव्हता त्या काळात या लोकांना खगोलशास्त्र आणि विमानविद्द्या अवगत होती? नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणुन काढलेल्या खुणा. अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ. ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही. ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती ब्राझीलमधील रिओ डि जानेरो मधे एका डोंगरावर आढळते. ह्या शिल्पाची मर्यादारेषा स्पष्ट करण्यासाठी जी फिनिशियन चित्रलिपी वापरण्यात आली आहे ती फिनिशियन जमात मध्यपुर्वेत नांदत होती.फिनिशियन लोक मध्यपुर्वेतुन येथे कसे पोचले असावेत ? तसेच ईजिप्तसारखेच पिरॅमिडस मेक्सिको मधे आहेत.आणि काश्मीर मधील परिहासपुर येथील मंदीराचे भग्नावशेष पिरॅमिडस ची आठवण करुन देते.एरिक व्हॉन डॅनिकेन या संशोधकाने मांडलेल्या काही सिद्धांताच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात बरेचसे धक्कादाक दावे केले आहेत. सर्वात महत्वाचा सिद्धांत हा, की देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव, व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव. इतिहासातील अशक्य अश्या वाटणाऱ्या पिरॅमिड व बाकी बऱ्याचश्या रचना बनवण्यामागे या अतिप्रगत जीवांची त्याकाळी मदत झाली असावी असे लेखकाचे मत आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
किंमत
70.00
समुदायाने जोडले
बंद