मुखपृष्ठ
पथेर पांचाली

माझे शेल्फ

पथेर पांचाली

इंग्रजी शीर्षक
Pather Panchali
सारांश

बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.

आजवर अनेक दिग्गजांनी या महान कलाकृती बद्दल लिहलेले आहे.. थोडासा प्रयत्न वाचलेला अनुभव सांगण्याचा. प्रसाद ठाकूर यांनी अप्रतिम, सामान्य वाचकाला समजेल असा सुंदर अनुवाद केला आहे.. हरिहर रे या गरिब ब्राह्मणाच्या कुटुंबात त्याची दोन मुले दुर्गा _अपू,प्नी सर्वजया आणि एक दुरच्या नात्यातील वृद्ध आतल्या इंदिरा आहेत. कांदबरी ची सुरूवात या वृद्ध आत्यापासून होते जवळचे कोणीच नसलेली शरीराने थकलेली आणि केवळ नाईलाज म्हणून हरीहरच्या घरी राहणारी ही इंदिरा आपल्याला क्षणोक्षणी हेलावून सोडते! कारण सर्वजयाला ती क्षणभरही नजरेसमोर नको असते घासभर अन्नासाठी ती सर्व सहन करत राहते! दुर्गा ला मात्र इंदिराचा लळा असतो.शेवटी उपासमारीमुळे तिचा मृत्यू होतो. अठराविश्व दारिद्र्यातही दोन्ही मुले आपल्या परीने आपला आनंद शोधत असतात.मग नीळकंठ पक्षी पाहण्याची अपूची बाळबोध इच्छा असो की नीळ कारखाना पाहून त्याला वाटलेले अप्रूप असो! लेखकाची शब्दशैली बघा, घरापासून दूर जायची अपूची ही पहिलीच वेळ होती.आपला गाव आणि नदीकाठ त्याला माहित होता. पण नवाबगंजकडे जाणारा पक्का रस्ता त्याने अजून पाहिला नव्हता. दुर्गा अपूपेक्षा मोठी.दिवसभर रानावनात, नदीकाठी मिळतील ती फळे शोधत फिरणारी. हे वाक्य मनाला चटका लावून जाते मिठाई खरेदी करून मुलांना खाऊ घालणं ही गोष्ट दुर्गाच्या आई_वडिलांना का परवडण्यासारखी होती? निश्चंडीपूरच्या रानात जणू निसर्गानंच तिच्यासाठी मिठाईच हे दुकान उघडलं होतं. असे निसर्गच्रक धावत असते.कुटुंबासाठी हरीहर पौराहित्य करत गावोगावी फिरत असतो.कित्येक दिवस त्याची काही खबरबात नसते. आणि अखेर तो जीवघेणा क्षण येतो.खूप दिवस चाललेल्या वादळी पावसाने सर्वजयावर उपासमारीची वेळ येते.त्यात दुर्गा तापाने फणफणते आणि ओल्या अथंरूणातच प्राण सोडते! दुर्गा अपूजवळ आगगाडी पाहण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा अपूबरोबर आपलेही डोळे पाणावतात. हरीहर कुटुंबाला घेऊन बनारसला येतो.काही दिवस बरे जातात परंतू इथेही दैव पाठलाग सोडत नाही आणि हरीहरचा मृत्यू होतो.सर्वजया स्वंयपाकाची काहीबाही कामे करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. अपूही लिहण वाचण शिकत असतो.या सगळ्या प्रवासात त्याला अनेक भलीबुरी माणसे भेटत जातात.अमलादी,रानूदी या दुर्गाच्या वयाच्या मुली,निरेनबाबू, राजपुत्र अजय,छोटी बहू प्रेमळ अशी बहुदी ! सर्व पात्रे कांदबरी मधे वेगवेगळे रंग भरतात. शेवटी बोरोबाबूंकडूनवेताचा मार खाल्लेला अपू पुन्हा एकाकी होतो.त्याला जन्मगावी जाण्याची अनिवार इच्छा होते तरीही लेखक म्हणतात की, आता तू थांबू शकत नाहीस. आता तू मागे जाऊ शकत नाहीस.तुला पुढेच चाललं पाहिजे`. वाचकांची उत्कंठा अशीच जिवंत ठेऊन कांदबरीचा शेवट होतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद