मुखपृष्ठ
पुढाकार घ्या : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र

माझे शेल्फ

पुढाकार घ्या : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र

इंग्रजी शीर्षक
Pudhakar Ghya : Prabhavi Vyaktimatvache Sutra
सारांश

जीवन व्यवस्थापन... सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्वत:चे शरीर, मन व मेंदू कायम सज्ज ठेवावे लागतात. अफाट धावाधाव करताना स्वभावत: काही बरे-वाईट बदल घडत जातात. याबाबत सतर्क करणारे व उपयुक्त मंत्र सांगणारे पुस्तक संजीव परळीकरांनी लिहिले आहे. ‘पुढाकार घ्य : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे सूत्र’ या पुस्तकातून त्यांनी जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही कृतिकार्यक्रम दिले आहेत. तेही सुलभ असल्याने वाचकांना अजमावून पाहावेसे वाटतील. सवयी, लकबी, वृत्ती, प्रवृत्ती वगैरेबाबत माणसे बरीच संवेदनशील असतात. याबाबत चांगले बदल तर करावेसे वाटतात, पण नेमके ते कसे करावेत, ते समजत नाही. अशांसाठी हे पुस्तक मित्रत्वाचा सल्ला देणारे ठरू शकते. यशस्वी होण्यासाठी मानसिकतेत बदल सुचविणारी पुस्तके गेल्या दोन दशकांमध्ये बऱ्याच प्रमाणात निघाली. त्यात निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. हे पुस्तक स्वत: पुढाकार घेण्याचा विचार मांडते. त्यामागे वस्तुनिष्ठपणा अधिक आहे. कल्पनेतील भराऱ्या नाहीत. त्यामुळेही हे पुस्तक वाचकांना जवळचे वाटू शकेल. व्यक्तिमत्त्वातील बदलांसाठी आवश्यक असलेली विचारशुद्धी, जगण्याच्या उद्देशाची निश्चिती, दैनंदिन जीवनक्रमाचे नियोजन, भावनांना वळण लावणे, नात्यांमधली स्वत:ची जबाबदारी लक्षात आणून देणे, शांत व स्थिर मनाचे महत्त्व वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवर यात सोदाहरण विवेचन आहे. कॉर्पोरेट विश्वातली माणसे किंवा गृहिणी अथवा विद्यार्थी, अशा सर्वांनाच कार्यकुशलता व प्रभावीपणा यातला फरक उलगडून सांगायचा यात प्रयत्न आहे. पुढाकार का घ्यावा, ते सोपे की कठीण, त्यातले फायदे-तोटे कोणते, वगैरे तपशिलात समजावून सांगत लेखक नकळतपणे या संदर्भातल्या स्वाध्यायासाठी वाचकाला प्रवृत्त करतो. नोकरी मिळणे, मनासारख्या गोष्टी घडणे, कौटुंबिक कलह मिटणे व एकूणच आनंदी राहता येण्यासाठी पुढाकाराची गरज आपल्याला आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टींना केव्हा, किती व कसे महत्त्व द्यायचे, याबाबत कानमंत्र या पुस्तकातून मिळतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद