माझे शेल्फ
फिअर इज द की
प्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला. समुद्रात गेला व अखेर समुद्रतळावर पोहोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस यात घणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार अॅलिस्टर मॅक्लीन याच्या ‘फिअर इज द की’च जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुभव मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणाऱ्या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसऱ्या कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखवणारी कादंबरी.पुस्तकातील प्रत्येक प्रसंग वाचताना समोर पाहत आहोत असे वाटते. पुस्तक वाचायला सुरू केल्यावर ठेवावेसेच वाटत नाही एवढे भारी आहे.टालबोटाची ही कथा खरोखरच स्फूर्तिदायक आहे. कथेची सुरुवात कोर्टात होते जिथे टालबोट हा एक गुन्हेगार म्हणून आपल्यासमोर येतो न्यायाधीशांसमोर त्याने केलेला युक्तिवाद खरोखरच वाचनीय आहे. नंतर त्याने कोर्टातून केलेले पलायन लेखकाने खूपच थरारक पद्धतीने लिहलय. या पलायनासाठी तो जिचा वापर करतो तिच्यामुळेच सुरू होतो तो थरारक प्रवास . कथेत खून. मारामारी. रोमांस. खजिना. असे अनेक ट्विस्ट आहेत. पुस्तकातून लेखकांचा समुद्र अभ्यास दिसून येतो कारण वेळोवेळी चकित करणारे पुस्तकातील सर्वच प्रसंग . पुस्तकाचा शेवट कल्पनेपलीकडचा व अतिशय थरारक आहे.टालबोट नक्की कोण असतो? तो वाचतो की मरतो? नायिकेचे शेवटी काय होते? असे अनेक प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे देणारे हे अतिशय स्फूर्तिदायक पुस्तक वाचायलाच पाहिजे .