मुखपृष्ठ
फॉरवर्ड अँड डिलीट

माझे शेल्फ

फॉरवर्ड अँड डिलीट

इंग्रजी शीर्षक
Forward And Delete
सारांश

अनपेक्षित शेवटाची कहाणी... सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यात ‘साइन इन-युवर नेम - पासवर्ड - मेल - ओपन - क्लिक - क्लिक - फॉरवर्ड - सेंट’ या सगळ्या स्टेप्स काही सेकंदात करता येतात, आणि एखादा आवडलेला ई-मेल क्षणात दुसऱ्याला पाठवता येतो. पण बीभत्स ई-मेल्सच्य चक्रव्यूहात अडकले की भल्याभल्यांचा अभिमन्यू होऊ शकतो. अशा क्षणिक आनंदाच्या मृगजळामागे धावणाऱ्या नरोत्तमाच्या आयुष्याचा होणारा धक्कादायक शेवट म्हणजे स्वाती चांदोरकरांची ही कादंबरी. कादंबरीची नायिका अमोलिका वास्तुविद्याविशारद आहे. रुपाने देखणी नसली तरी नाकी-डोळी नीटस असणारी ही आत्मविश्वासू मुलगी, सुसंस्कारित, नीतिमान आहे. या उलट तिचा नवा आणि कादंबरीचा नायक नरोत्तम फडणीस हा सुखवस्तू घरातला, हुशार मात्र अहंकारी आणि ‘ग’ची बाधा झालेला तरुण. कादंबरी या दोन मुख्य पात्रांभोवती फिरते. अमोलिका बांधीलकी पाळणारी तर नरोत्तम विषयासक्त असल्याने अधमेध्ये त्यांच्या संसारात वादळे येत राहतात. मात्र वाट चुकलेला नरोत्तम, त्याला येणारे अश्लील ई-मेल्स इतरांना फॉरवर्ड करत राहतो, ई-मेल फॉरवर्ड करण्याइतकं आयुष्य सोपं असतं, या समजुतीवर जगू लागतो. लग्नानंतर, मुलगा झाल्यावरही त्याची ही सवय सुटत नाही, उलट ती व्यसनात बदलते. असा हा नरोत्तम म्हणजे, ध्येयहीन, शरीरसुखाची चटक लागलेला, त्याचा विश्वात बुडालेला, भरकटलेल्या वाटेवरचा तरुण पिढीचा जणू प्रतिनिधी आहे. या लोकांना ताटात वाढलेले नीट खाण्याचेही भान उरत नाही आणि व्हायचे तेच होते. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होतातच मात्र त्यांचे संसारही धुळीला मिळतात, कधी कधी अनेक कोवळ्या कळ्या या विकृतींना बळी पडून भस्म होतात. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कथेची नायिका करते. अवघी २०० पानेही नसलेल्या या पुस्तकात घडणाऱ्या घटना अत्यंत वेगाने घडत जातात अमोलिकाचे व्यावसायिक आयुष्य यशस्वितेचे शिखर गाठत असते, एका हॉस्पिटलचे डिझाइन बनवताना तिने केलेल्या बारकाव्यांचा अभ्यास, उगाचंच नसून त्याचा उपयोग कथेच्या शेवटी लेखिकेने अत्यंत खुबीने केला आहे. कादंबरी अनोळखी वळणे घेत पुढे जाते, शेवट अत्यंत अनपेक्षित, अकल्पित आणि चटका लावणारा आहे. आजच्या काळाचे समर्पक चित्र उभे करण्यासाठी, धकाधकीचे जीवनमान शब्दात पकडण्यासाठी लेखिकेने घेतलेला इंग्रजीचा आधार अपरिहार्य वाटतो. रक्षिता, अमोलिकाची आई, बाई सप्रे, फडणीस दांपत्य यांची पात्रे कथेच्या सूत्रात मोलाची भर घालतात. मात्र उमाकांत सप्रेंची मूल्ये, त्यांची वैचारिक बैठक वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. उदाहरणादाखल त्यांचे पत्नीला म्हणजे बाई सप्रेंना उद्देशून एक स्वागत आहे. ‘मला नेहमीच एक कोडं पडतं. समजा एक व्यक्ती... तिला तिच्या लहानपणी काही गोष्टी मिळाल्या नाहीत, म्हणजे प्रेम, वात्सल्य, कौतुक वगैरे, अशी व्यक्ती मोठी होते. तिचं लग्न होतं. तिला मूल होतं. तर, त्या मुलाला ती कसं वाढवेल? जे आपल्याला मिळालं नाही, ते ती आपल्या मुलाला देईल? की जे मिळालंच नाही म्हणून द्यायचं कसं हेच तिला समजणार नाही. बाई या दुसऱ्या प्रकारात मोडतात. नायिकेची भावनिक गुंतागुंत, त्यावर अलगद फुंकर घालणारी अकील या तिच्या सहकाऱ्याची निखळ मैत्री स्वाती चांदोरकरांनी सुरेख रेखाटली आहे. कादंबरी नात्यांमधल्या गुंत्याबद्दल भाष्य करेल असे वाटत असताना, एका सामाजिक समस्येकडे आपले लक्ष वेधते. मलपृष्ठावरील पुस्तकाच्या मजकुराचा हळूहळू संदर्भ लागतो. सूडभावनेने पेटलेल्या व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या असतात, या गृहीतकाला फोल ठरवणारे वळण वाचकांचे कुतूहल वाढवते. बदल्याची आग सर्वसामान्यांचेही आयुष्य ढवळून काढू शकते, याची खात्री पटते आणि शांत डोक्याने केलेल्या कट-कारस्थानांचा मक्ता हा पुरुषवर्गाचा किंवा सराईत गुन्हेगारांचा, या धारणेला शंभर टक्के हादरे देणारा शेवट कादंबरीचा परमोच्च बिंदू ठरेल असा आहे. म्हणूनच आवर्जून वाचावे असे पुस्तक.

व्यक्तिगत मतमतांतरे आणि राजकीय रंग येऊ न देता, आत्मीयतेच्या धाग्याने रंजक गुंफण करणाऱ्या प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनातून उलगडणारी एका पत्रकाराची ही शोधक भ्रमंती आहे. गेली चाळीस वर्षे अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या दिलीप चित्रेंनी (कवी दिलीप चित्रे नव्हे) पुस्तकाच्या प्रस्तावनेत नेमकेपणाने म्हटले आहे. ‘हे पुस्तक म्हणजे ललित लेखनाच्या शैलीत लिहिलेला, देशांतरितांच्या एका पिढीच्या जीवनाचा एक ऐतिहासिक ‘दस्तावेज’ आहे. भविष्यात याला शैक्षणिक मूल्य प्राप्त होणार आहे आणि या विषयाच्या अभ्यासकांच्या पिढ्या या ग्रंथाचा शिडीसारखा उपयोग करणार आहेत.’ एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशींपासून पोट भरायला परदेशात गेलेल्या पंजाबातील अशिक्षित मजुरांपर्यंतचे ऐतिहासिक संदर्भ लेखिकेने धुंडाळले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतातील स्वप्नभारले दिवस संपल्यावर देशउभारणीच्या कामाकडे पाठ फिरवून

परदेशी चालते होण्याची मानसिकता, त्यावेळची उलाघाल आणि नंतर दुभंगलेले जीणे सावरताना झालेली तारांबळ याचे तपशील मुळातून वाचावे असेच. लेखिकेने म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक हा एका समूहाचा अभ्यास आहे; पण तरीही यातील अनेक माणसं आपल्या मनात घर करतात. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्टस्, आयआयटीयन्स्, शास्त्रज्ञ आणि त्यांच्याशी लग्न करून नवऱ्यामागून परदेशगमन केलेल्या एका मुशीतून काढल्यासारख्या दिसणाऱ्या त्यांच्या देखण्या अर्धांगीनी, त्यांचे मैत्रीगट... संसाराचा गाडा ओढताना झालेली त्यांची तारांबळ, अस्तित्वासाठीचे तुंबळ संघर्ष, मराठी मंडळींचे गट व गटबाजीचे राजकारण, परदेशात गेल्यावर उफाळून आलेली धार्मिकता आणि उत्सवप्रियता याचे नेमके चित्रण इथे केलेले आहे. अमेरिकेत या स्थलांतरित भारतीय माणसांना येणारे दोन महत्त्वाचे प्रश्नही या पुस्तकात चर्चिले गेले आहेत- ग्लाससिलिंग आणि डिस्क्रिमिनेशन-वर्णभेद! ‘दे नीड अस, बट दे डोन्ट वॉन्ट अस!’चा भेदक अनुभव! तब्बल तीन पिढ्या आजी आजोबा, आई-बाबा आणि तरुण नातवंडं यांच्यातील संघर्ष व सामंजस्य! मुलांवर संस्कार करण्याचा, अमेरिकन मातीतून ‘इंडियन मडके’ घडवण्याचा मागील पिढीचा प्रयत्न व त्यातून उडणाऱ्या ठिणग्या! मागच्या पिढीच्या- एबीसीडीजच्या (अमेरिका बॉर्न, कॉन्फिडंट देसीज) अनोख्या भावविश्वातही फेरफटका करून येते.यशस्वी, चकचकीत वैभवशाली समृद्ध घरांबरोबर अपयशी, थकलेली, रखडलेली काही घरेही इथे भेटतात. तसेच सधन, सुशिक्षित अमेरिकन भारतीयांच्या घरातही काही स्त्रियांच्या वाट्याला आलेली मारहाण, पन्नाशीत घटस्फोट घेऊन वेगळी होणारी तेथली मराठी जोडपी यांचे जगणे अंतर्मुख करून जाते. ही गोष्ट फक्त भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या समूहाची रहात नाही तर अनादीकाळापासून स्थलांतर करणाऱ्या अखिल मानवजातीची होते. या स्थलांतरित माणसांची सामूहिक व व्यक्तिगत पातळीवरील सुख-दु:खं, आशा-निराशा-संघर्ष- जिथे जाऊ तिथल्या संस्कृतीत विलीन होण्याचा अट्टाहास; पण त्याचबरोबर स्वत:चा चेहरा टिकवण्याची धडपड आणि यातून घडत जाणारे मानवी नातेसंबंध... या साऱ्याचा हा विस्मयकारक असा समग्र शोध आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद