माझे शेल्फ
फरासी प्रेमिक
अस्तित्वाची कहाणी!... ‘फरासि प्रमिक’ (फ्रेंच प्रेमिक) ही तसलिमा नासरीन यांची नवी कादंबरी. मूळच्या या बंगाली कादंबरीचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे.मायभूमीच्या दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि लढ्याची ही कहाणी आहे– नीलांजन या बंगाली तरुणीची. उपहारगृह मालक असणाऱ्या किशनलालशी तिचा विवाह झाल्यानंतर ती पॅरिसमध्ये येते. पॅरिसमधल्या किशनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोेरी पिंजऱ्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशा-आकांक्षा पूर्ण होणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण एवढंच तिचं स्थान राहतं. तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत असतानाच तिला गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा राजबिंड तरुण भेटतो.बेनॉयार ड्यूपॉट... गोरापान, निळ्याशार डोळ्यांच्या राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्याप्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पेरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो... नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात... हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशाआकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे, त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे... आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो... धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवास्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे. धाडसी कल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या एका स्त्रीच्या मनोवस्थेचं वेधक चित्रण या कादंबरीत आहे.